TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MECON Recruitment 2021: मेकॉन लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती Rojgar News

MECON Recruitment 2021: मेकॉन लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती Rojgar News
MECON Recruitment 2021: मेकॉन लिमिटेड (MECON) मध्ये अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया शुक्रवार २६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होणार आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख २५ डिसेंबर २०२१ आहे. या भरती प्रक्रियेद्वारे विविध प्रकारची एकूण ७८ पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक योग्यता (Educational Qualifications) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant manager) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजीनियरिंग (Civil Engineering) किंवा एमबीए पदवी असणे आवश्यक आहे. उप व्यवस्थापक (deputy manager) पदासाठी मेकॅनिकल इंजीनियरिंगची पदवी आवश्यक आहे. GM पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कॉम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक योग्यतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन पाहावे. वयोमर्यादा (Age limit) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय ३० वर्षे तर कमाल वय ५२ वर्षे असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वय ओबीसी (OBC) प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी (SC) व एसटी (ST) प्रवर्गासाठी पाच वर्षांची सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया (Selection Process) अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतींशी संबंधित सर्व माहिती मेल आयडीद्वारे दिली जाईल. अयोग्य अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही. पदांची माहिती सहाय्यक व्यवस्थापक (Assistant manager) - १७ पदे उप व्यवस्थापक (deputy manager) – २५ पदे मॅनेजर ( manager) - २२ पदे सीनियर मॅनेजर (senior manager)- ४ पदे एजीएम (AGM)-२ पदे उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager)- ३ पदे जीएम (GM)- ५ पदे


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/313DkbJ
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या