TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MHT CET: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बीई, बीटेक अभ्यासक्रमासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत, बीफार्मसी २३ नोव्हेंबर, बीआर्च २० नोव्हेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली. सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर बीई, बीटेक, एमआर्च, एमसीए, एमफार्मसी, एमई/एमटेक, डीएसई, बीआर्च, डीएसपी, बीएचएमसीटी, एमबीए/एमएमएस, बीफार्मसी आदी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली. त्यात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली मुदत वाढवून देण्याचा निर्णय सीईटी सेलने मंगळवारी घेतला. अमरावती येथे संचारबंदी व इंटरनेट बंद असल्याने उमेदवारांना अर्ज करताना अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळे नोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार एमआर्च १९ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. एमसीए २२ नोव्हेंबर, एम. फार्मसी १९ नोव्हेंबर, एमई/एमटेक १९ नोव्हेंबर, डीएसई २० नोव्हेंबर, डीएसपी २१ नोव्हेंबर, बीएचएमसीटी १८ नोव्हेंबर, एमबीए/एमएमएस २२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fo6EIC
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या