TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

UGC NET परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड Rojgar News

UGC NET Admit Card 2021: २२ आणि २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी लॉगिन क्रेडेंशियल, अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरावी लागणार आहे. महत्त्वाच्या तारखा एनटीए २०, २१, २२, २४, २५, २६,२९, ३० नोव्हेंबर आणि १, ३, ४ आणि ५ डिसेंबर या तारखांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्रोफेसरसाठी पात्रतेसाठी यूजीसी-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) डिसेंबर २०२० आणि जून २०२१ सायकल आयोजित करणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) द्वारे होणार आहेय यूजीसी नेट परीक्षा २०२१ नुसार, एनटीए यूजीसी नेट २०२१परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. वेळापत्रकानुसार, बंगाली, कन्नड, गृहविज्ञान, हिंदी, भूगोल, समाजशास्त्र आणि संस्कृतसाठी १५ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. यापूर्वी एनटीएने २० आणि २१ नोव्हेंबर २०२१ च्या यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले होते. UGC NET Admit Card: असे करा डाऊनलोड स्टेप १: सर्वात आधी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा. स्टेप २: होमपेज वर प्रवेशपत्राच्या लिंक वर क्लिक करा. स्टेप ३: आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन भरा स्टेप ४: त्यानंतर सबमिटवर क्लिक करा. स्टेप ५: स्क्रीन वर '' उघडेल. स्टेप ६: ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा. उमेदवारांनी यूजीसी नेट प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यावर जाहीर केलेल्या तारखेला, शिफ्टला आणि वेळेत परीक्षेला बसावे लागेल. प्रवेशपत्र हे अनिवार्य कागदपत्रांपैकी एक आहे आणि उमेदवारांना ते परीक्षा केंद्रावर घेऊन जावे लागेल. उमेदवारांनी प्रवेशपत्रासाठी फोटो सोबत नेणे देखील अनिवार्य आहे. या अंतर्गत उमेदवार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कोणतीही कागदपत्रे आणू शकतात. याव्यतिरिक्त परीक्षेचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर लवकरच जाहीर केला जाईल. उमेदवारांनी यूजीसी नेट प्रवेश पत्र २०२१ मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून परीक्षेदरम्यान त्यांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. यात काही अडचणी आल्यास ते एनटीएच्या हेल्पलाइनवर सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान संपर्क साधू शकतात किंवा एनटीएचा ईमेल आयडी ugcnet@nta.ac.in वर लिहू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DoWh6M
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या