Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-11-17T12:44:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSC Exam 2022: दहावी परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला सुरूवात Rojgar News

Advertisement
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी (SSC Exam 2022) अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१ पासून सुरूवात होणार आहे. माध्यमिक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरायचे आहेत. नियमित, पुनर्परीक्षार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणारे, तसेच खासगी विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रिया १८ नोव्हेंबर पासून सुरू होणार असून नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची तारीख २० डिसेंबर २०२१ आहे. माध्यमिक शाळांनी चलानद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२१ ते ३० डिसेंबर २०२१ आहे. त्यानंतर माध्यमिक शाळांनी प्री-लिस्ट मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१ आहे. विलंब शुल्कासह दहावीचा अर्ज भरण्याचा कालावधी २० डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने असे आवाहन केले आहे की दहावी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wWaUft
via nmkadda