TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Bank Of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर भरती Rojgar News

BOB IT SO Recruitment 2021: जर तुमच्याकडे B.Tech, B.E. आणि M Tech डिग्री असेल तर तुम्हाला बँकेत नोकरीची उत्तम संधी आहे. बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने ( Bank of Baroda, BOB) ने आयटी स्पेशलिस्ट ऑफिसर, डाटा सायंटिस्ट अँड डाटा इंजिनीयर ( IT Specialist Officer (Data Scientist and Data Engineer) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. BOB या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण १५ रिक्त पदे भरणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया १६ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ६ डिसेंबर २०२१ आहे. महत्त्वाच्या तारखा: ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : १६ नोव्हेंबर २०२१ ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख : ६ डिसेंबर २०२१ शैक्षणिक पात्रता डाटा सायंटिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान ६० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्समध्ये B. Tech/ B.E./ M Tech/ M.E पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त डेटा इंजीनियर पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे कॉम्प्युटर सायन्स किंवा Information टेक्नोलॉजी मधील बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त Cloudera Certified Administrator क्रिडेंशियल असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक उमेदवार ६ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज जमा केल्यानंतर उमेदवारांनी आपल्या संदर्भासाठी त्या अर्जाचे एक प्रिंटआऊट भविष्यातील संदर्भासाठी जरूर घ्यावे. या भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट @bankofbaroda.in ला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FF1w31
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या