TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MCC NEET Counseling 2021: महाराष्ट्र MBBS, BDS कॉलेजनिहाय अपेक्षित कट ऑफ जाणून घ्या Rojgar News

MCC 2021: मेडिकल कोर्सेसमधील प्रवेशासाठी आयोजित नीट २०२१ परीक्षेतील पात्र उमेदवारांसाठी नीट काऊन्सेलिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीतर्फे (Medical Counselling Committee, MCC) लवकरच राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा, नीट २०२१ (NEET 2021) किंवा एमसीसी नीट काऊन्सेलिंग २०२१ ( NEET Counseling 2021)चे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग अधिकृत वेबसाइट info.mahacet.org वर ऑनलाइन जाहीर केले जाणार आहे. नीट २०२१ पात्र उमेदवारांनी कॉलेजनिहाय कट-ऑफ पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलतर्फे यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीकृत समुपदेशन प्रक्रिया घेण्यात येईल. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण ९,००० जागा आणि बीडीएसच्या ३,५२६ जागा उपलब्ध आहेत. एमसीसी नीट काउंन्सेलिंगचे तपशील लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहेत. राज्यातील खासगी किंवा अल्पसंख्याक संस्थांमधील सरकारी, कॉर्पोरेट, सरकारी अनुदानित आणि राज्य कोट्यातील जागांसाठी हे प्रवेश घेतले जातील. एमसीसी नीट काऊन्सेलिंग २०२१ साठी पात्र उमेदवारांनी प्रथम सीईटी सेलच्या वेबसाइट mahacet.org वर नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे. काऊन्सेलिंगमध्ये सहभागी होण्यासाठी त्याने महाराष्ट्र राज्य मंडळातून इयत्ता दहाावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे प्राधान्य, नीट २०२१ रॅंक, सीट मॅट्रिक्स आणि आरक्षणावर आधारित वाटप यादी तयार केली जाईल.एमसीसी नीट काऊन्सेलिंग २०२१ बद्दल अधिक अपडेट्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एमसीसी नीट काऊन्सेलिंग २०२१: महाराष्ट्र कॉलेजनिहाय अपेक्षित कट-ऑफ महाविद्यालयाचे नाव आणि अपेक्षित एमबीबीएस कट ऑफ: सेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज - २६६९ बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - ७२९६ ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स- ३२१९ लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल- ८३०५ टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटल - ५०१३ अपेक्षित कट ऑफ: शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय- ६७३१८ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय - ५९,८८० शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय - ६५, ३९५ महात्मा गांधी मिशन दंत महाविद्यालय आणि रुग्णालय- १५६१४४ नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज - ६४५५४


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/30s3AvM
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या