Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १७, २०२१ WIB
Last Updated 2021-11-17T11:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ASER 2021: सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ Rojgar News

Advertisement
सरकारी शाळांसाठी मोठी दिलासादायक अशी बाब यंदाच्या असर अहवालातून पुढे आली आहे. देशभरातील सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट ( ,ASER) 2021 मध्ये नोंदवण्यात आलं आहे. प्रथम या स्वयंसेवी संस्थेद्वारे असर अहवालामार्फत दरवर्षी देशातील शैक्षणिक स्थितीचा लेखाजोखा मांडला जातो. देशपातळीवर खासगी शाळांमधील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली असून दुसरीकडे शासकीय शाळांमधील पटनोंदणीत वाढ झाली आहे. २०१८ मध्ये खासगी शाळांमधील पटसंख्या २४.४ टक्के होती, ती २०२१ मध्ये घटून ३२.५ टक्के झाली आहे. शासकीय शाळांमधील पटनोंदणी २०१८ साली ६४.३ टक्के होती, ती २०२१ मध्ये ७०.३ टक्के इतकी झाली आहे. शिक्षणासाठी खासगी शिकवणीचा आधार घेण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे हा सर्व्हे सांगतो. २०१८ मध्ये देशपातळीवर ३० टक्क्यांहून कमी विदयार्थी खासगी शिकवणीला जात होते, हे प्रमाण २०२१ मध्ये ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कोविड-१९ विषाणू संक्रमण स्थिती, लॉकडाऊन आदी घटनांमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांचे पडसादही या अहवालात दिसून आले. २०१८ मध्ये ३६.५ टक्के मुलांकडे स्मार्टफोन होते, हे प्रमाण २०२१ मध्ये ६७.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांकडे (७९ टक्के), शासकीय शाळांमधील (६३.७ टक्के) विद्यार्थ्यांपेक्षा अधिक प्रमाणात स्मार्टफोन आहेत. मात्र स्मार्टफोन जवळ असला तरी अनेक विद्यार्थ्यांना त्याचा अॅक्सेस नसल्याचेही या अहवालात नमूद केले आहे. महामारी काळानंतर, शाळेत पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ९१.९ टक्के विद्यार्थ्यांकडे त्यांच्या चालू इयत्तेचे पाठ्यपुस्तक होते, असेही हा अहवाल सांगतो. महामारी काळात हे प्रमाण कमी होते. २०१४ नंतर दर एकवर्षाआड असर अहवाल प्रकाशित केला जातो. २००५ ते २०१४ या कालावधीत दरवर्षी हा अहवाल प्रकाशित केला जात होता. ग्रामीण भागातील शाळेत जाणाऱ्या ५ ते १६ वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, लिहिण्या-वाचण्याची क्षमता, गणिती कौशल्यं यावर हा अहवाल प्रकाश टाकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FmtAI6
via nmkadda