TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MHT CET: व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Admission Schedule: महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उच्च शिक्षण विभागाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं काऊन्सेलिंगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आता महा सीईटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड ४ वर्षे अभ्यासक्रम, विधी ५ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या तीन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अभ्यासक्रमानिहाय वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची थेट लिंक देण्यात आली आहे. बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम वेळापत्रक माहिती अपलोड करण्याची तारीख- १७ नोव्हेंबर २०२१ MS/OMS साठी उमेदवार नोंदणी - १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर अपलोड केलेल्या कागदपत्रांची ई-तपासणी- १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२१ अपलोड केलेल्या कागदपत्रांची ई-तपासणी- १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर अल्फाबेटिकल मेरीट लिस्ट- ६ डिसेंबर तक्रारी नोंदविणे आणि निवारण- ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर अंतिम गुणवत्ता यादीचे प्रकाशन. राऊंड १- १० डिसेंबर २०२१ अलोकेशन राऊंड- १४ डिसेंबर पहिल्या फेरीसाठी प्रवेश- १५ डिसेंबर ते १८-डिसेंबर २०२१ कॉलेजद्वारे यादी प्रसिद्ध- २० डिसेंबर २०२१ भरलेल्या आणि रिक्त जागांची यादी- २१ डिसेंबर २०२१ राऊंड २ - ७ जानेवारी २०२२ कट ऑफ शेवटची तारीख - २८ जानेवारी २०२२ लॉ ५ वर्षे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम वेळापत्रक वाटप फेरी राऊंड १- २० डिसेंबर २०२१ कॉलेजमध्ये रिपोर्ट- २१ ते २४ डिसेंबर २०२१ कॉलेजतर्फे प्रवेश घेतलेल्यांची यादी- २७ डिसेंबर २०२१ रिक्त जागांची यादी- २८ डिसेंबर २०२१ राऊंड २ - १८ जानेवारी २०२२ कट ऑफची शेवटची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२ बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रम वेळापत्रक अल्फाबेटनुसार यादी- ६ डिसेंबर तक्रारी नोंदविणे- ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर अंतिम गुणवत्ता यादीचे प्रकाशन- १० डिसेंबर वाटप फेरी - १४ डिसेंबर २०२१ कॉलेजमध्ये रिपोर्ट- १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर कॉलेजतर्फे प्रवेशित उमेदवारांची यादी- २० डिसेंबर भरलेल्या जागा आणि रिक्त जागांची यादी- २१ डिसेंबर २०२१ राऊंड २ - ७ जानेवारी २०२१ कट ऑफची शेवटची तारीख- २८ जानेवारी २०२२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HwD7hK
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या