Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T11:43:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

MPSC परीक्षा: अवघ्या २१० जागांसाठी २.५ लाखांहून अधिक अर्ज Rojgar News

Advertisement
2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. या परीक्षेत २.५ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या भरतीद्वारे विविध विभागातील विविध पदांच्या एकूण २१० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)वतीने जाहीर करण्यात आलेल्या नोटिसनुसार, उपजिल्हाधिकारी ग्रुप ए, पोलिस उपअधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त - ग्रुप ए (Assistant Commissioner of Police - Group A), सहाय्यक राज्य कर आयुक्त (Assistant State Tax Commissioner), गट विकास अधिकारी (Group Development Officer or equivalent) किंवा समकक्ष पद, सहायक संचालक (Assistant Director), महाराष्ट्र वित्त (Maharashtra Finance), लेखा सेवा (Accounts Services), उद्योग उपसंचालक तांत्रिक (Deputy Director of Industry.)आणि इतर अनेक पदे भरली जाणार आहेत. रिक्त जागांचा तपशील या परीक्षेसाठी ( 2021) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला होता. अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ ची जाहिरात आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ रोजी आणि मुख्य परीक्षा ७,८ आणि ९ मे २०२२ रोजी होणार आहे. एका नोटिफिकेशननुसार २०१८ पासून राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये किमान १५ हजार पदे रिक्त आहेत. या परीक्षेद्वारे रिक्त पदे भरण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून उमेदवारांकडून होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा (MPSC), मुख्य परीक्षा आणि मुलाखत () द्वारे केली जाणार आहे. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवारच मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. तर मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. यासाठी पूर्व परीक्षा ४०० गुणांची असेल. कोण अर्ज करू शकेल? मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र होते. कोणत्याही स्ट्रीममधून किमान वर्षे कालावधीचा डिप्लोमा करणारे उमेदवार देखील यासाठी अर्ज करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4t4L7
via nmkadda