Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T09:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AIIMS INI CET 2021: एम्स आयएनआय सीईटीचा निकाल जाहीर Rojgar News

Advertisement
INI CET 2021: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्ली ने इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स कंबाइंड एंट्र्न्स टेस्ट (INI CET) 2021 चा निकाल जाहीर केला आहे. संस्थेद्वारे एकूण १० एम्स, जिपमर पुद्दुचेरी, पीजीआईएमईआर चंडीगड, निमहन्स-बेंगळुरू आणि एससीटीआयएमएसटी, त्रिवेंद्रममध्ये असणाऱ्या विविध पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. एमडी, एमएस, डीएम (६ वर्षीय), एमसीएच (६ वर्षीय) आणि एमडीएस या अभ्यासक्रमांच्या जानेवारी २०२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर २० नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहेत. दिल्ली द्वारे INI CET 2021 चे आयोजन १४ नोव्हेंबर रोजी सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) मोड मध्ये करण्यात आलं होतं. पुढील पद्धतीने पाहा आपला निकाल ज्या उमेदवारांनी AIIMS द्वारे आयोजित INI CET 2021 परीक्षा दिली होती, ते आपला स्कोर आणि रँक पाहण्यासाठी परीक्षेचं पोर्टल, aiimsexams.ac.in ला भेट देऊ शकतात आणि मग होम पेजवर दिलेल्या important announcement सेक्शनमध्ये संबंधित परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर निकाल पाहता येईल. यासाठी उघडलेल्या पीडीएफ फाइलमध्ये उमेदवारांना आपला रोल नंबर सर्च करून आपले गुण आणि ओव्हरऑल रँक पाहता येईल. या वृत्तात पुढे दिलेल्या लिंकवरदेखील उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. एम्स दिल्ली द्वारा INI CET 2021 निकालासह जारी नोटीसनुसार एमडी, एमएस, डीएम (६ वर्षीय) आणि एमसीएच (६ वर्षीय) कोर्सेस साठी एकूण २५,६६६ उमेदवार यशस्वी ठरले आणि एमडीएस कोर्ससाठी २,५४३ उमेदवार यशस्वी ठरले. ज्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलं आहे, त्यांना पात्रतेच्या अन्य अटी पूर्ण कराव्या लागतील. संबंधित संस्था पडताळणी करतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DIn3H8
via nmkadda