Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T09:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

C-DAC मध्ये भरती, ४५ हजार ते १ लाख ६५ हजारपर्यंत मिळेल पगार Rojgar News

Advertisement
C-DAC : सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (Centre for Development of Advanced Computing,C-DAC)मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. सीडॅकच्या मुंबईतील कार्यालयाद्वारे या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहेत. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. सीडॅकने जाहीर केलेल्या रिक्त पदांनुसार (), प्रोजेक्ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) Project Manager (Knowledge Partner), प्रोजेक्ट इंजिनीअर (Project Engineer), सिनीअर प्रोजेक्ट इंजिनीअर (Senior Project Engineer) या पदांसाठी एकूण १११ पदांची भरती केली जाणार आहे. कोण अर्ज करू शकतो? प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी उमेदवार संबंधित विषयात बीई/बीटेक (BE/BTech) किंवा एमसीए ( MCA ) मध्ये फर्स्ट क्लास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या पदासाठी वयोमर्यादा ५० वर्षांपर्यंत आहे. यासोबत उमेदवारांकडे संबंधित कामाचा नऊ वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी, उमेदवाराने संबंधित विषयातील बीई/बीटेक किंवा एमसीए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच कामाचा तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. पगार प्रोजेक्ट मॅनेजर (नॉलेज पार्टनर) या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराला प्रति महिना १ लाख २० हजार ते १ लाख ६५ हजार रुपये पगार मिळेल. प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर भरती झाल्यानंतर ५६ हजार ५०० ते ६६ हजार रुपये दरमहा वेतन मिळेल. प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ४५ हजार ते ५२ हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. अर्जाचा तपशील पदभरतीच्या नोटिफिकेशननुसार मुंबईमध्ये अर्ज करण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी (C-DAC Recruitment 2021) इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सीडॅकची अधिकृत वेबसाइट cdac.in वर जाऊन ऑनलाइन करावा लागेल. अर्ज शुल्क या पदांसाठी उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. एससी, एसटी दिव्यांग आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य असणार आहे. याशिवाय महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातूनही दिलासा देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DHXPbZ
via nmkadda