Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T07:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

TET Exam Answer Key 2021: टीईटीची आन्सर की कधी होणार जाहीर? जाणून घ्या Rojgar News

Advertisement
महाराष्ट्र (Maharashtra Teacher Eligibility Test, ) रविवार, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरळीत पार पडली. टीईटी परीक्षेची उत्तरतालिका (TET Exam Answer Key 2021) लवकरच जारी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही उत्तरतालिका जारी करण्यात येईल. उमेदवारांनी टीईटी उत्तरतालिकेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी टीईटीचे अधिकृत संकेतस्थळ ला भेट देत राहावी. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. टीईटीच्या पेपर एकसाठी दोन लाख ५४ हजार ४२८, पेपर दोनसाठी दोन लाख १४ हजार २५० उमेदवारांनी नोंदणी केली होती. यातील साधारण ९० टक्के उमेदवारांची टीईटी परीक्षेला उपस्थिती होती. परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली. सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ४.३० पर्यंत अशा दोन सत्रात पेपर १ आणि पेपर २ पार पडले. टीईटीची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज झाल्यावर उमेदवारांना हरकती घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला जाईल. उमेदवारांच्या हरकती, आक्षेपांचा विचार करून अंतिम उत्तरतालिका आणि निकाल जाहीर करण्यात येईल. ही १ डिसेंबर २०२१ पर्यंत जारी होण्याची शक्यता आहे. परीक्षेची काठिण्य पातळी काय होती? विविध तज्ज्ञांनी केलेल्या टीईटी परीक्षेच्या समीक्षेनुसार आणि उमेदवारांच्या मतांनुसार, टीईटी पेपरची काठिण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. विषयनिहाय काठिण्य पातळी पुढीलप्रमाणे - विषय -- काठिण्य पातळी चाइल्ड सायकॉलॉजी अँड पेडगॉजी -- सोपी ते मध्यम मराठी - सोपी इंग्रजी - सोपी ते मध्यम गणित - सोपी ते मध्यम कॅम्पस प्रॅक्टिस - सोपी ही परीक्षा आधी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार होती, पण ती लांबणीवर पडून २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली. या परीक्षेत एकूण १५० प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाला १ गुण होता. पेपरचा कालावधी अडीच तासांचा होता. सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ६० टक्के गुण तर ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DHUPfF
via nmkadda