Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T07:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NCB अधिकारी बनून मिळवा सरकारी नोकरी; पगार, पात्रता सर्वकाही जाणून घ्या Rojgar News

Advertisement
NCB Post Details: कोर्डेलिया क्रूझ पार्टीतील (Cordelia Cruise Party) आर्यन खान केसप्रकरणानंतर (Aryan Khan Case) देशाचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विभाग सध्या चर्चेत आहे. अधिकाऱ्यांकडे काय अधिकार असतात? एनसीबी अधिकारी बनण्यासाठी काय पात्रता असते? असे अनेक प्रश्न तरुण विचारत आहेत. एनसीबी अधिकारी बनून तुम्ही देशसेवा करण्याची इच्छा पूर्ण करु शकता. देशातील अनेक तरुण एनसीबीकडे करिअरचा उत्तम पर्याय म्हणून पाहत आहेत. तुम्हाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (, NCB) मध्ये काम करायचे असेल तर एनसीबी अधिकारी कसे बनायचे? याची माहिती असणे आवश्यक आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ही संस्था भारतात अंमली पदार्थांच्या तस्करीशी लढण्यासाठी आणि अवैध पदार्थांचा गैरवापर रोखण्यासाठी काम करते. ही देशाची नोडल ड्रग कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. एनसीबी थेट गृह मंत्रालयाला (MHA) अहवाल देते. एनसीबी ही संस्था खूप शक्तिशाली मानली जाते. या संस्थेत थेट अधिकारी भरती व्यतिरिक्त भारतीय महसूल सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि निमलष्करी दलांमधून भरती केली जाते. एनसीबीमध्ये हजारो अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. एनसीबीचे मुख्यालय दिल्लीत आहे. याशिवाय, चेन्नई, अहमदाबाद, जम्मू, कोलकाता, मुंबई, लखनऊ, बंगळुरू, चंदीगड, पाटणा, दिल्ली, जोधपूर आणि इंदूर येथे विभागीय कार्यालय आहेत. पात्रता एनसीबी अधिकारी होण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी नसावे. उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावा. आवश्यक पात्रता प्राप्त केल्यानंतर उमेदवारांनी यूपीएससी/एमपीएससी परीक्षा देणे गरजेचे आहे. यूजी किंवा पीजी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार यूपीएससी किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पगार ज्युनिअर इंटेलिजन्स अधिकाऱ्याला सुरुवातील १.८० हजार वार्षिक ते ४ लाख २० हजारपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. तसेच नार्कोटिक्स इन्स्पेक्टर पदासाठी २ लाख ४० हजार वार्षिक ते ५ लाख ५० हजारपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो. एनसीबीची स्थापना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना १७ मार्च १९८६ रोजी झाली. नार्कोटिक्स ड्रग्ज आणि अवैध तस्करी रोखणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FBsvMB
via nmkadda