Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-02T04:43:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET UG Result 2021: मुंबईची कार्तिका नायर देशात पहिली Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला. या परीक्षेत मुंबईची कार्तिका नायरसह, तेलंगणाचा म्रिणाल कट्टेरी आणि दिल्लीचा तन्मय गुप्ता या विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. कार्तिकाने ७२० गुण (९९.९९९८०६ पर्सेंटाइल) मिळवले आहेत. हृदय मोहिते हा महाराष्ट्राचा आणखी एक विद्यार्थी देशात पाचवा आला आहे. ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सोमवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात देशात पहिल्या वीस विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे. यंदा भौतिकशास्त्राचा पेपर काहीसा अवघड होता. त्याचा परिणाम निकालावरही जाणवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे गुण ७०० चा आकडा पार करू शकत नव्हते. यंदा राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे डीपर संस्थेचे संचालक हरीश बुटले यांनी सांगितले आहे. ‘डीपर’मध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या जवळपास २५० हून अधिक विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण असल्याचेही त्यांनी नमूद केले. या परीक्षेत महाराष्ट्राच्या कार्थिका नायरसह, तेलंगणाचा म्रिणाल कट्टेरी आणि दिल्लीचा तन्मय गुप्ता या विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. कार्थिकाने ७२० गुण (९९.९९९८०६ पर्सेंटाइल) मिळवले आहेत. हृदय मोहिते हा महाराष्ट्राचा आणखी एक विद्यार्थी देशात पाचवा आला आहे. यात देशात पहिल्या वीस विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले आहे. गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे गुण ७०० चा आकडा पार करू शकत नव्हते. यंदा राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याचे डीपर संस्थेचे संचालक हरीश बुटले यांनी सांगितले आहे. ‘डीपर’मध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या जवळपास २५० हून अधिक विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘नीट’चा अभ्यास करताना मला कधी निराश वाटलेच तर त्यावेळी माझ्या पालकांनी मला खूप दिलासा आणि साथ दिली. आपल्या चुका समजून घेऊन त्या पुन्हा होऊ न देण्याचा सल्ला देत त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी वेळोवेळी शंकांचे निरसन केले आणि योग्य मार्गदशनही केले. अथक परिश्रमांचे हे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया हिने दिली आहे. NEET : असा पाहा निकाल सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या. निकालाच्या लिंकवर क्लिक करा. लॉगिन क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट करा. तुमच्या स्क्रीनवर रिझल्ट दिसेल. तो डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी निकालाची प्रिंटआउट घ्या. निकाल पाहण्यास अडचणी ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘एनटीए’ची वेबसाइट बराच काळ हँग झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. साधारण एक ते दोन तासानंतर निकाल पाहता आला, असे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GEkJTL
via nmkadda