Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-12T06:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात वाढ; विद्यार्थीसंख्या घटण्याची भीती Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाचवी; तसेच आठवीच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेश शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली आहे. या शुल्कवाढीमुळे देण्याकडे कल नसणारे विद्यार्थी यापुढे परीक्षा देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाला पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा काही कालावधीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय़ गुरुवारी घेतला. या निर्णयानुसार बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये केले आहे, तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ६० रुपयांवरून १५० रुपये केले आहे. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, आतापासून ७५ रुपये आकरण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याच वेळी पाचवीची शिष्यवृत्ती सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येत वर्षातील दहा महिने २५० ते एक हजार रुपयांपर्यंत मिळते, तर आठवीची शिष्यवृत्ती नववी आणि दहावीत प्रत्येकी दहा महिन्यांसाठी ३०० ते दीड हजार रुपयांपर्यत मिळते. ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याचे शिक्षक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक शिष्यवृत्तीच्या परीक्षा गांभीर्यांने घेत नाहीत. आता या परीक्षांच्या शुल्कात अडीचपट वाढ करण्यात आल्याने, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत निम्म्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत शुल्कवाढ करून, शालेय शिक्षण विभागाने कोणता उद्देश साधला, अशी विचारणा होऊ लागली आहे. परीक्षेचा खर्च वाढल्याने शुल्कात वाढ शालेय शिक्षण विभागाने २०१० सालानंतर शिष्यवृत्तीच्या रक्कमेत फारशी वाढ केली नाही. मात्र, २०१६मध्ये आणि आता ११ नोव्हेंबरला शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्कवाढीसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल तयार करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या शुल्कात वाढ करण्यात येत असल्याचा दाखला शिक्षण विभागाने दिला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wBXgxP
via nmkadda