Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-11-08T12:44:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पुणे विद्यापीठाचे लडाख केंद्र पुढील शैक्षणिक वर्षात Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या प्रादुर्भावामुळे रखडलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधन केंद्र २०२२-२३ या पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या केंद्रासाठी विद्यापीठ अभ्यास समिती स्थापन करण्यात आली. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावात समितीला काम करण्यास अडचणी आल्यामुळे, केंद्र स्थापन करण्याबाबतचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला मिळालेला नाही, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. पुणे विद्यापीठाने नुकतेच कतारमधील दोहा शहरात स्थानिक शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाशी समन्वय साधत रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्गांना सुरूवात केली आहे. त्यामुळे परदेशात अभ्यासक्रम सुरू करणारे हे देशातले पहिले विद्यापीठ ठरले आहे. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यापीठाचे कौतुक केले आहे. त्यानंतर आता पुणे विद्यापीठाच्या लडाखच्या शैक्षणिक केंद्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शैक्षणिक केंद्राची घोषणा साधारण दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यासाठी मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्य़क्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवाल विद्यापीठ प्रशासनाला मिळाल्यानंतर, त्यानुसार कार्यवाही होणार आहे. मात्र, त्यातील दीड वर्षाच्या कालावधीत करोनाचा प्रादुर्भाव असल्याने, केंद्र सुरू करण्याबातचे काम थंडबस्त्यात गेले आहे. देशात करोनाची परिस्थिती सामान्य होत असल्याने, समितीचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्याचप्रमाणे लडाखमध्ये प्रत्यक्ष केंद्र सुरू करण्याबाबत चाचपणी करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. लडाख संशोधन केंद्राविषयी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर विद्यापीठाने शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचा ठराव विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीने मान्य केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी लडाखमधील काही शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यापीठाच्या केंद्रासाठी एक पाऊल पुढे टाकले होते. ऑक्टोबर २०१९मध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनीही विद्यापीठाचे लडाखमध्ये स्वागत केले. त्यांनी कुलगुरू डॉ. करमळकर यांची भेट घेऊन, त्यांना केंद्राबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. लडाखमधील हिमनदी, भूशास्त्र, नैसर्गिक साधनसंपत्ती, कृषी व जैविक शेती, औषधी वनस्पती यासह इतर क्षेत्रात संशोधन करण्याबाबत नामग्याल यांनी सुचवले आहे. त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन केंद्र लडाखमध्ये सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. संशोधनासोबतच स्थानिक परिस्थितीशी निगडीत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. करोनाचा प्रादुर्भाव दीड वर्ष असल्याने, या काळात लडाखमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन केंद्र उभारण्याबाबत कामकाज करता आले नाही. लडाख केंद्रासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचा अहवाल आला, की त्यानुसार कार्यवाही होईल. करोनाचा प्रादुर्भाव नसल्यास, पुढील शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक स्तरावरील काम करता येईल. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करोनाचा प्रादुर्भाव असल्याने, तेथे विद्यापीठ अभ्यास समितीच्या सदस्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाज करण्यात अडचणी आल्या. राज्यपाल आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेटही होऊ शकली नाही. या काळात अभ्यास समितीच्या दोन बैठका झाल्या असून, लडाख शैक्षणिक केंद्राबाबतचा अंतरिम निकाल तयार आहे. या शैक्षणिक केंद्राचा पहिला टप्पा म्हणून यंदापासून 'स्टुडन्ट एक्स्चेंज प्रोग्राम' सुरू होईल. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक केंद्राचे कामकाज सुरू करू. - राजेश पांडे, मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GUaMBw
via nmkadda