Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १०, २०२१ WIB
Last Updated 2021-11-10T10:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

वैद्यकीय अभ्यासक्रमात करणार कालसुसंगत बदल: डॉ. माधुरी कानिटकर Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या काही वर्षांत आजारांमध्ये बदल झाला आहे. हा बदल लक्षात घेत त्यानुसार अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असून, कोव्हिडसारख्या आपत्तींवर हे शिक्षण प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू व लेफ्टनंट जनरल (निवृत्त) यांनी केले. विद्यापीठातील पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. डॉ. कानिटकर म्हणाल्या, की आज आपण डायबेटिस, हायपरटेन्शन, हृदयरोग यांसारख्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर सामना करीत आहोत. ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आरोग्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातही तसे बदल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांनाही प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यामुळे फॅकल्टी ट्रेनिंगवरही भर दिला जाणार आहे. कोव्हिडमुळे ऑनलाइन शिक्षणाचा एक चांगला पर्याय समोर आला आहे. त्या माध्यमातून अनेक गोष्टी विविध भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे. इंटर्नशिपदरम्यानच विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटन्सी बेसड् मोड्युल्स तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नसलेल्या परंतु, डॉक्टरीपेशासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकण्यास मदत होणार आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आरोग्य शिक्षणातही कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा अवलंब केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम, विविध पथींमधील उपयुक्त अभ्यासक्रमाचा सर्व पथींच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव, नर्सिंग अॅटेंडन्ट कोर्स, फॅमिली मेडिसीन कोर्स यांसारखे अभ्यासक्रम राबविण्यासाठी विद्यापीठामार्फत भविष्यात पुढाकार घेतला जाणार असल्याचे डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी एन. व्ही. कळसकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे उपस्थित होते. ..असे आहे व्हिजन डॉक्युमेंट? आरोग्य शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केल्याचे डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले. आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू, सर्व अभ्यासक्रमांच्या कौन्सिल, डीन यांच्याशी चर्चा करून हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी अभ्यासक्रम व कामकाजात कोणते आवश्यक बदल करायचे व कोणत्या योजना राबवायच्या याबाबत आखणी करण्यात आली आहे. प्रत्येक योजना पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरविण्यात आली असून, त्या-त्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्याचे बंधनही संबंधितांना राहणार आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट राज्यपाल, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यासमोर सोमवारी (दि. १५ नोव्हेंबर) सादर केले जाणार असल्याचे डॉ. कानिटकर म्हणाल्या. एक लाख ९६ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा उन्हाळी सत्र २०२० ते उन्हाळी सत्र २०२१ या कोव्हिड कालावधीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत एक लाख ९६ हजार ४१९ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. सर्वत्र ऑनलाइन परीक्षा सुरू असताना टप्प्याटप्प्याने कोव्हिड कवच सुविधेसह, तसेच कोव्हिड चाचण्यांसह ऑफलाइन परीक्षांचेही नियोजन करण्यात आले होते. याबाबतीत देशातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सरस ठरल्याचे डॉ. कानिटकर म्हणाल्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YwbweM
via nmkadda