जगातल्या टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत जामियातले १६ संशोधक! Rojgar News

जगातल्या टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत जामियातले १६ संशोधक! Rojgar News

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने अलीकडेच जगातल्या टॉप २ टक्के वैज्ञानिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या तब्बल १६ संशोधकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील एकूण ३,३५२ संशोधकांनी या यादीत स्थान मिळवले आहे. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक प्रो. जॉन इओनिडिसच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या एका टीमने ही यादी तयार केली आहे. ही यादी जाहीर होताच जामिया मिलिया इस्लामियाच्या नावात मानाचा तुरा खोवला गेला अशी प्रतिक्रिया कुलगुरु नजमा अख्तर यांनी दिली. स्टॅनफर्ड विद्यापीठामार्फत दोन वेगवेगळ्या याद्या तयार केल्या गेल्या. पहिली यादी करिअर लाँग डेटावर आधारित आहे, यात ८ प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे. २०२० सालच्या दुसऱ्या यादीत जामियाच्या १६ संशोधकांना स्थान मिळाले आहे. या आधारे तयार झाली यादी या यादीत वैज्ञानिकांचे २२ विविध क्षेत्रं आणि उपक्षेत्रातील वर्गीकरण करण्यात आले आहे. करिअर लाँग डेटाला २०२० च्या अखेरपर्यंत अपडेट केलं जाते. या आधारे टॉप १ लाख किंवा २ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक संशोधकांची निवड केली जाते. हा मान मिळणे विद्यापीठासाठी गौरवाची बाब असल्याचे जामियाच्या कुलगुरु नजमा अख्तर म्हणाल्या. जामियाचे प्रा. इम्रान अली, प्रा. अतीकुर रहमान, प्रा. अंजन सेन, प्रा. हसीब अहसान, प्रा. सुशांत घोष, प्रा. एस. अहमद आणि डॉ. मोहम्मद इम्तियाज यांचा दोन्ही याद्यांमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत प्रा. आबिद हलीम, प्रा. रफीक अहमद, प्रा. तबरेज आलम खान, प्रा. मोहम्मद जावेद, प्रा. अरशद नूर सिद्दीकी, प्रा. मुशीर अहमद, प्रा. फैजान अहमद आणि प्रा. तारिकुल इस्लाम यांचा समावेश झाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3n3gKYM
via nmkadda

0 Response to "जगातल्या टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत जामियातले १६ संशोधक! Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel