CBSE: परीक्षेतील गैरप्रकारांवर असणार बोर्डाची नजर Rojgar News

CBSE: परीक्षेतील गैरप्रकारांवर असणार बोर्डाची नजर Rojgar News

Exam: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) परीक्षांमधील संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्ट ( ) वापर केला जाणार आहे. यामुळे परीक्षा पारदर्शी होण्यास मदत होणार आहे. सीबीएसईचे आयटी संचालक अंत्रिक जोहरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. या परीक्षा प्रमाणबद्ध आणि निष्पक्ष पद्धतीने घेतल्या जातील असेही ते म्हणाले. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरप्रकार करण्यापासून रोखण्यासाठी बाहेरील पर्यवेक्षक आणि भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांमध्ये लक्ष ठेवले जाणार आहे. CBSE टर्म १ च्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. गैरप्रकार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या परीक्षाकेंद्रांमध्ये अॅडव्हान्स्ड डेटा अॅनालिस्टच्या मदतीने सुधारणा केली जाणार असल्याचे जोहरी यांनी सांगितले. केंद्र आणि व्यक्तीगत परीक्षार्थी स्तरावर संशयास्पद डेटा पॅटर्न ओळखण्यासाठी सेंट्रल स्क्वेअर फाउंडेशन (CSF) आणि प्लेपॉवर लॅब यांच्या सहकार्याने जानेवारी २०२१ मध्ये () परीक्षेच्या डेटावर प्रायोगिक विश्लेषण करण्यात आल्याचे जोहरी म्हणाले. आता अशा प्रकारचे विश्लेषण सीबीएसईच्या सर्व परीक्षांमध्ये केले जाणार आहे. तसेच, याचा उपयोग नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आणि बोर्ड परीक्षांची विश्वासार्हता मजबूत करण्यासाठी केला जाईल. CBSE टर्म १ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर CBSE टर्म १ परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबर आणि बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांची प्रवेशपत्र ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रवेशपत्राव्यतिरिक्त, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली जाणार आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. सीबीएसई टर्म १ परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र शाळांच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केले जातील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या पोर्टलवर प्रवेशपत्र मिळू शकेल. याशिवाय सेल्फ सेंटर आणि परीक्षा केंद्रांबाबतही बोर्डातर्फे सविस्तर माहिती दिली जाणार आहे. वेळापत्रकानुसार, टर्म १ ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. इयत्ता दहावीची पहिली परीक्षा १७ नोव्हेंबरपासून तर बारावीची परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दहावी, बारावी या दोन्ही मुल्यांकनासाठी बोर्ड परीक्षेत ओएमआर वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल. प्रवेशपत्रासंदर्भात अपडेट केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे आयोजित केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवेशपत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. सीटीईटी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची नेमकी तारीख आणि वेळ CBSE ने अद्याप जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे त्यांना प्रवेशपत्रासंबंधी अचूक माहिती मिळू शकणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C6B6EN
via nmkadda

0 Response to "CBSE: परीक्षेतील गैरप्रकारांवर असणार बोर्डाची नजर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel