IBPS तर्फे ४१३५ पदांची भरती, अर्ज करण्यासाठी अखेरची संधी Rojgar News

IBPS तर्फे ४१३५ पदांची भरती, अर्ज करण्यासाठी अखेरची संधी Rojgar News

PO Exam 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध राष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण ४१३५ पदांची भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची १० नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांकडे अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. IBPS PO/MO साठी असा करा अर्ज सरकारी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनीच्या ४ हजारहून अधिक पदांवर भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. पदांसाठी इच्छुक उमेदवार IBPS ची अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रियेअंतर्ग उमेदवार २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नोंदणी करू शकतील. तसेच, त्याच तारखेपर्यंत, उमेदवारांना विहित अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने (IBPS) ११ सहयोगी बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती केली जाते. यंदा ८ बॅंकांमध्ये ही भरती होणार आहे. यावेळेस ११ सहयोगी बँकांमधून आठ बँकांमधील एकूण ४,१३५ रिक्त आहेत. (अजा-६७९, अज-३५०, इमाव-११०२, इडब्ल्यूएस-४०४, खुला-१६००). दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २१० पदं राखीव आहेत (एचआय-५८, ओसी-३७, व्हीआय-४८, आयडी-६७). पात्रता- १० नोव्हेंबर, २०२१ रोजी पदवी उत्तीर्ण वयोमर्यादा- १ ऑक्टोबर, २०२१ रोजी २० ते ३० वर्षं (इमाव-३३ वर्षांपर्यंत, अजा/अज- ३५ वर्षांपर्यंत, दिव्यांग-४० वर्षांपर्यंत). अधिकृत नोटिफिकेशननुसार, उमेदवारांकडे 'भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी) किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे." यावेळेस युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सर्वाधिक ९१२ रिक्त पदे आहेत. भरती २०२१ साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी किमान पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D7jQkg
via nmkadda

0 Response to "IBPS तर्फे ४१३५ पदांची भरती, अर्ज करण्यासाठी अखेरची संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel