Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-25T09:43:14Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षणात आता ड्युएल डिग्रीचे नाविन्यपूर्ण प्रयोग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'देशात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून, त्यानुसार आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणात 'ट्विनिंग प्रोग्रॅम' आणि 'ड्युएल डिग्री'चे नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. शैक्षणिक धोरणानुसार आगामी काळात नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याकडे कल राहणार आहे,' अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांनी बुधवारी दिली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी विद्यापीठात ऑनलाइन पद्धतीने 'इंडो-फ्रेंच नॉलेज समिट'ला सुरुवात झाली. त्या वेळी प्रधान बोलत होते. या वेळी फ्रान्सचे उच्च शिक्षण, संशोधन व नवसंशोधनमंत्री फेडरिक्यु विडाल, पृथ्वी विज्ञान व विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते. प्रधान म्हणाले, 'भारताने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात भर देण्याबाबरोबरच सामाजिक सुधारणा करण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्यावरही भर दिला जाणार आहे.' रवीचंद्रन म्हणाले, 'भारत संशोधन निबंध प्रसिद्ध करण्यात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून भारताचे संशोधनातील कार्य अधोरेखित होते.' या परिषदेच्या पहिल्या दिवशी 'इंडो फ्रेंच सायंटिफिक को-ऑपरेशन इन' या विषयावर केंद्र सरकारमधील मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. विजय राघवन, फ्रान्सच्या शिक्षण, विज्ञान व संस्कृतीचे डॉ. निकोलस घेरार्डी, 'इंडो फ्रेंच सेंटर फॉर दी प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स रिसर्च'च्या संचालिका डॉ. पौर्णिमा रूपल यांनी आपले विचार मांडले. नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सूत्रसंचालन केले. या परिषदेत आरोग्य (संसर्गजन्य आजार), सागरी विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत ऊर्जा, हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने आदी विषयांवर चर्चा होणार आहे. यातून अनेक करार, एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेण्यासंदर्भात ठराव करण्यात येण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्सच्या विद्यापीठांमधील व संशोधन क्षेत्रातील १०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ या 'नॉलेज समिट'मध्ये सहभागी झाले आहेत. या 'नॉलेज समिट'च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्राबरोबरच सागरी विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत ऊर्जा, हरित रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि नैसर्गिक संसाधने या क्षेत्रातील कमतरतांवर काम करण्याची ही संधी आहे. विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशनही याच सर्व क्षेत्रांत काम करीत आहे. या माध्यमातून 'इंटरडिसिप्लिनरी रिसर्च' पुणे विद्यापीठात करण्यात येत आहे. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फ्रान्सने करोनाकाळात भारतीय विद्यार्थी व संशोधकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य दिले असून, पुढील १० वर्षांत आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी २५ अब्ज युरोची तरतूद केली आहे. फ्रान्समध्ये संशोधनाला जाणाऱ्या भारतीय संशोधकांची संख्या २०२५ पर्यंत दुप्पट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - फेडरिक्यु विडाल, उच्च शिक्षण व नवसंशोधनमंत्री


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l9GOAq
via nmkadda