संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नाशिकचा झेंडा, वेदांतला हवामान परिषदेत संधी Rojgar News

संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नाशिकचा झेंडा, वेदांतला हवामान परिषदेत संधी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: करोना काळात ‘ऑनलाइन शिक्षण योग्य की अयोग्य’ या वादामध्ये न पडता विज्ञान शाखेमध्ये बारावीत शिकणाऱ्या वेदांत कुलकर्णी या युवकाने संयुक्त राष्ट्रांतर्फे (यूएन) युवकांसाठी आयोजित पर्यावरणविषयक परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळविली आहे. इटलीतील एक परिषद आटोपत नाही तोच आता ब्रिटनतर्फे नियोजित परिषदेच्या निमंत्रणाचा मानकरीही तो बनला आहे. विशेष म्हणजे या परिषदेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होण्याची वाट वेदांतने स्वयंप्रेरणा आणि स्वप्रयत्नाच्या बळावर शोधून काढली. जागतिक स्तरावर होणाऱ्या हवामानविषयक बदलांसंदर्भात त्याने सादर केलेल्या अभ्यासपूर्ण भूमिकेमुळे ‘वर्ल्ड लीडर्स समीट’मध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘यांगो’ या ‘हवामान आणि पर्यावरण’ क्षेत्रासाठी ब्रिटन सरकारच्या वतीने परिषदेचे आयोजन ग्लासगो येथे करण्यात आले आहे. या परिषदेत विविध देशांचे पंतप्रधान आणि मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले आहेत. या ‘वर्ल्ड लीडर्स समीट’साठीही वेदांत हा भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या परिषदेत सहभाग राहिला. वेदांतचे शिक्षण येवला व नाशिक शहरातून झाले आहे. बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेकडे न वळता यापेक्षा वेगळी वाट निवडण्याचा त्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी म्हणून संयुक्त राष्ट्रांकडून युवक म्हणून मिळणाऱ्या मंचामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास वेदांतने व्यक्त केला आहे. वेदांतचे वडील राहुल विधिज्ञ असून, आई सोनाली या प्राध्यापिका आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या ‘यांगो’ या ‘हवामान आणि पर्यावरण’ क्षेत्रासाठी ब्रिटन सरकारच्या वतीने परिषदेचे आयोजन ग्लासगो येथे करण्यात आले आहे. या ‘वर्ल्ड लीडर्स समीट’साठीही वेदांत हा भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या परिषदेत सहभाग राहिला. वेदांतचे शिक्षण येवला व नाशिक शहरातून झाले आहे. बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेकडे न वळता यापेक्षा वेगळी वाट निवडण्याचा त्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पूर्वतयारी म्हणून संयुक्त राष्ट्रांकडून युवक म्हणून मिळणाऱ्या मंचामुळे मोठी उभारी मिळेल, असा विश्वास वेदांतने व्यक्त केला आहे. वेदांतचे वडील राहुल विधिज्ञ असून, आई सोनाली या प्राध्यापिका आहेत. १९० देशांतील प्रतिनिधींसमोर संधी बारावीत शिक्षण घेणारा वेदांत अभ्यासासोबतच पर्यावरणासारख्या विषयाचा अभ्यास छंद म्हणून करीत आहे. त्यातूनच ऑनलाइन सर्फिंग करताना त्याला सप्टेंबरअखेरच्या ‘यूथ फॉर क्लायमेट’ या आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती मिळाली. यामध्ये ‘जागतिक तापमानवाढ’ किंवा ‘हवामान बदलांचे दूरगामी परिणाम’ यांसारख्या विषयांवर युवक या नात्याने भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध होती. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करीत त्याने या मंचावर वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी सहभागी होती दमदारपणे मांडणी केली. त्याच्या मांडणीची दखल घेत परिषदेने गव्हर्नन्स कमिटीवर त्याची निवड करीत सुमारे १९० देशांमधून सहभागी झालेल्या ४०० प्रतिनिधींसमोर भूमिका मांडणीची संधी दिली. बारावीत शिक्षण घेताना वेदांतने स्वप्रयत्नाने संयुक्त राष्ट्रांतर्फे युवकांसाठी आयोजित परिषदेत सहभागाची संधी मिळविली. इटलीत पार पडलेली ‘यूथ फॉर क्लायमेट’ ही परिषद व सद्यस्थितीत लंडनमध्ये सुरू असणाऱ्या ‘वर्ल्ड लीडर्स समीट’मध्ये सहभागी होण्याचा वेदांतचा अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय युवकांचे बळ वाढविणारा असल्याची प्रतिक्रिया वेदांतची आई प्रा. सोनाली कुलकर्णी यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q5wFYC
via nmkadda

0 Response to "संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत नाशिकचा झेंडा, वेदांतला हवामान परिषदेत संधी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel