Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T09:43:55Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

लशीला नकार, तर वेतनाला मुकाल... कॉलेजला जाणे टाळणाऱ्या प्राध्यापकांना इशारा Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : करोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली कॉलेजे पुन्हा सुरू होत आहेत. यासाठी लसीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र काही प्राध्यापकांनी लस न घेण्याचा पवित्रा घेत ऑनलाइन अध्यापन करण्याचाच निश्चय केल्याने प्राचार्यांना ही मोठी डोकेदुखी झाली आहे. लस घेऊन कॉलेजला जाणे टाळण्याकडे काही प्राध्यापकांचा कल असल्याचे दिसून येत आहे. कॉलेज सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांना दोन्ही लशींचे डोस पूर्ण करणे सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही प्राध्यापकांनी जाणूनबुजून लस न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे आता त्यांना कॉलेजमध्ये बोलावता येणार नाही. हीच बाब शाळांच्या बाबतीतही समोर येत आहे. ज्यांनी वैद्यकीय कारणांमुळे लसीकरण केले नाही त्यांना यातून मुभा देण्यात आली आहे. पण असे कोणतेही कारण नसताना, केवळ लसीकरणाला विरोध अशी भूमिका घेत अनेक शिक्षक आणि प्राध्यापकांनी कायमस्वरुपी ऑनलाइन शिकवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. म्हणजे या शिक्षक आणि प्राध्यापकांनी आम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये येण्यास तयार आहोत, मात्र लस घेणार नाही, असे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना कळविले आहे. पण, सरकारी नियमांनुसार या शिक्षकांना लसमात्रा झाल्याशिवाय त्यांना प्रत्यक्ष अध्यापनास परवानगी देण्यात येणार नाही. यामुळे या शैक्षणिक तासिकांचे नियेाजन करत असताना कसे करावे? असा प्रश्न शाळा आणि कॉलेज प्रमुखांना पडत आहे. यावर सरकारी यंत्रणेकडे विचारणा केल्यास प्रमुखांना कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने अशा शिक्षकांवर काय कारवाई करावी? असा प्रश्न पडला आहे. याचबरोबर तासिकांचे नियोजन करताना, इतर शिक्षकांच्या तुलनेत यांच्या वाटेला येणाऱ्या तासिका कमी असल्याने शिकवायचे कसे? असे प्रश्न प्रमुखांना पडले आहेत. यामुळे यावर सरकारी पातळीवरून मार्गदर्शन मिळावे यासाठी शिक्षण संस्थांचे प्रमुख संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा करत आहेत. ...तर वेतन रोखणार दरम्यान, याबाबत उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक सोनाली रोडे यांना विचारणा केली असता, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सर्व प्राध्यापकांना लसीकरणाची सक्ती असल्याची घोषणा नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारमध्ये केल्याचे सांगितले. यानुसार लवरकच परिपत्रक काढण्यात येणार आहे. प्राध्यापकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाइन उपस्थिती अनिवार्य राहील यासाठी लसीच्या दोन्ही लसमात्रा पूर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर वेतन रोखण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, असेही रोडे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3osYGXB
via nmkadda