Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T09:43:57Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job: बीएसएफमध्ये विविध पदांची भरती, दहावी पास असणाऱ्यांना संधी Rojgar News

Advertisement
BSF Recruitment: भारतीय सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरी शोधत असलेल्या किंवा बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) ने इंजिनीअरिंग सेटअपमध्ये एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, पगार, वयोमर्यादा, अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएफने प्रसिद्ध केलेल्या (ग्रुप पीसी/२०२१) जाहिरातीनुसार, एकूण ७२ पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी ३२ पदे अनारक्षित आहेत, तर उर्वरित ४० पदे इडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. याप्रमाणे करा अर्ज बीएसएफ ग्रुप सी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना २९ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार बीएसएफची अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेचे वेळ नोंदणी, ऑनलाइन अर्ज भरणे आणि परीक्षा शुल्क भरणे असे तीन टप्पे आहेत. BSF ग्रुप सी भरती २०२१: पदनिहाय रिक्त पदांची संख्या ASI (डीएम ग्रेड-३) – १ पद हेड कॉन्स्टेबल (सुतार) – ४ पदे हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) – २ पदे कॉन्स्टेबल (सिव्हरमन) – २ पदे कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर) – २४ पदे कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) – २८ पदे कॉन्स्टेबल (लाइनमन) – ११ पदे एएसआय (डिएम ग्रेड-३) पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी आणि ड्राफ्ट्समनशिपमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. २९ डिसेंबरपर्यंत सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सवलत मिळणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DhA3DH
via nmkadda