Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T12:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आरबीआयमध्ये नोकरीची संधी, पदवीधर करु शकतात अर्ज Rojgar News

Advertisement
RBI Summer Internship 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आरबीआयकडून महत्वाची बातमी येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या माध्यमातून वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रम () जाहीर करण्यात आला आहे. नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुण विद्यार्थी आणि फ्रेशर्सना करिअरच्या दृष्टीकोनातून एक उत्तम संधी मिळणार आहे. या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. समर इंटर्नशिप २०२२ या भरतीअंतर्गत उमेदवार इकोनॉमिक्स, बँकिंग, फायना्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळवू शकतात. परदेशी विद्यार्थीही देखील यासाठी अर्ज करु शकतात.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या वार्षिक समर इंटर्नशिप प्रोग्राम (RBI Summer Internship 2022) साठी इंटर्नशिपची घोषणा केली आहे. आरबीआय इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे एकूण १२५ इंटर्नची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या इंटर्नला फक्त मुंबईतील बँकेच्या केंद्रीय कार्यालय विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. याप्रमाणे करा अर्ज या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी उन्हाळी इंटर्नशिपसाठी अधिकृत वेबसाइट- chances.rbi.org.in वर अर्ज करू शकतात. परदेशी विद्यार्थी पोस्टाने अर्ज भरून अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मुख्य महाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), सेंट्रल ऑफिस, २१ वा मजला, सेंट्रल ऑफिस बिल्डिंग, शहीद भगतसिंग रोड, मुंबई – ४००००१ येथे अर्ज पाठवायचा आहे. तसेच अधिकृत ईमेल cgminchrmd@rbi.org.in वर देखील अर्ज पाठवता येऊ शकेल. असा करा अर्ज मॅनजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ, इकोनॉमिक्स, बॅंकिंग, फायनान्समध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. पूर्ण तीन वर्षांची व्यावसायिक पदवी घेत असलेले विद्यार्थी इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय मॅनेजमेंट, कॉमर्स, स्टॅटिस्टिक्स, लॉ इत्यादी विषयात शिकणार असलेले परदेशी विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड प्रक्रिया अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलाखत घेतली जाईल. ज्याचे अंतिम निकाल मार्च २०२२ मध्ये जाहीर केले जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट chances.rbi.org.in वर उमेदवारांना अधिक माहिती मिळू शकणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3otv0JV
via nmkadda