Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-11-01T13:43:53Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आरोग्य भरती परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे: आरोग्य भरती परीक्षेत गैरप्रकार होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करूनही रविवारी परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊन, पेपरफुटीचा प्रकार घडला आणि या भरतीप्रक्रियेतील गोंधळाच्या मालिकेत आणखी एका मनस्तापाची भर पडली. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेच्या गठ्ठ्यांना सील नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खासगी कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कारवाई करण्यासोबतच सविस्तर तपासाची मागणी उमेदवारांनी केली आहे. आरोग्य विभागाकडून गट 'क' आणि 'ड' पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या परीक्षेची जबाबदारी खासगी आयटी कंपनी ‘न्यासा कम्युनिकेशन्स’कडे दिली आहे. गेल्या रविवारी ‘क’ गटाच्या पदांसाठी लेखी परीक्षा झाली. या परीक्षेतही काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ आणि गैरप्रकार झाले. त्यामुळे गट ‘ड’ पदासाठी सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेत गोंधळ होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फौज उभी केली होती; मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नसल्याचे रविवारी घडलेल्या प्रकारामुळे स्पष्ट झाले. गट ‘ड’ संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील तीन हजार ४६२ पदे भरण्यासाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी चार लाख ६१ हजार ४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानुसार राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुपारी दोन ते चार या वेळेत ही परीक्षा झाली. मात्र, सकाळी साडेआठच्या सुमारास उमेदवारांच्या व्हॉट्सअॅप, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. प्रश्नपत्रिका गहाळ होऊ नये, यासाठी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्याची उत्तरे कोऱ्या कागदावर लिहिली होती. या दोन्हींची एकत्रित पीडीएफ सकाळी व्हायरल झाली होती. परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांनी व्हायरल झालेली पीडीएफ, प्रश्नपत्रिका; तसेच प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तपासली असता, तेच प्रश्न आणि उत्तरे होती. यानंतर राज्यातील उमेदवारांनी आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठ्यांना सील नव्हते. याबाबत भंडारा येथील स्व. सुलोचनादेवी पारधी हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी चित्रीकरण करून पुरावा दिला आहे. राज्य सरकारने तातडीने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समिती, एमपीएससी स्टुडन्ट राइट्स, युवक क्रांती दल आदी संघटनांकडून करण्यात आली आहे. संचालक म्हणतात, परीक्षा सुरळीत पेपर फुटल्यामुळे राज्यभर संताप व्यक्त होत असताना सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ‘ड’ संवर्गातील पदे भरण्यासाठीची लेखी परीक्षा रविवारी सुरळीतपणे पार पडल्याचा दावा आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, ‘चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्ह्यांमध्ये उमेदवारांनी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला; मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत उमेदवारांनी आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. वरील केंद्रांवर उमेदवारांना सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परीक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाद्वारे परीक्षा देण्याचा प्रयत्न केला; मात्र स्थानिक पोलिसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.’ आरोग्य भरतीमधील ‘ड’ गटाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका औरंगाबाद परिसरातून व्हायरल झाली आहे. याबाबतचे काही पुरावे आमच्याकडे असून, पोलिसांकडे तक्रार करणार आहोत. राज्य सरकारने संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करावी असे एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी सांगितले. आरोग्य भरती प्रक्रियेसाठी झालेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका व्हायरल होऊन पेपरफुटी झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने संपूर्ण भरती प्रक्रियेचा तपास करावा. याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेउन, पदभरतीबाबत चर्चा करणार असल्याचे युवासेनेचे कल्पेश यादव म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mAkbq0
via nmkadda