ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर' Rojgar News

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर' Rojgar News

सूर्यकांत आसबे, सोलापूर : सुमारे सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविलेले सोलापूरचे गुरुजी आता डॉक्टर बनले आहेत. शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डिसले गुरुजी यांना ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाकडून मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आगळावेगळा शिक्षणात प्रयोग करत जगात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन डिसले गुरुजींना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे डिसले गुरुजी आता शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर बनले आहेत. डिसले गुरुजी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर करत मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याचे सांगितले आहे. आणि डॉक्टरेट मिळाल्याचा आनंदही व्यक्त केला आहे. माझ्यासाठी मानद डॉक्टरेट पदवी आश्चर्यकारक बाब असल्याचे सांगत त्यांनी हा आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडे असल्याचे पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CFr9yC
via nmkadda

0 Response to "ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी बनले 'डॉक्टर' Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel