Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-11-24T08:43:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयआयएममध्ये भगवद्गीतेतून शिकवले जाणार मॅनेजमेंट स्किल्स Rojgar News

Advertisement
IIM : देशातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्था 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद' (IIM Ahmedabad) आता भगवद्गीतेतील (Bhagavad Gita) (IIM Management skills) शिकविणार आहे. यासाठी आयआयएम अहमदाबादने 'अंडरस्टँडिंग ' नावाचा नवीन कोर्स सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी कॅट परीक्षा किंवा इतर कोणत्याही प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता नसेल. केवळ नोंदणी करून उमेदवार या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. हा एक ऑनलाइन (प्रमाणपत्र) कोर्स असून विशेषतः वर्किंग प्रोफेशनल्ससाठी बनविण्यात आला आहे. आयआयएम अहमदाबादने दिलेल्या माहितीनुसार, सुरळीत व्यवसाय मॉडेलसाठी नैतिक व्यवस्थापनाला चालना देण्याचे मार्ग शिकवणे हे या कोर्सचे उद्दीष्ट्य आहे. त्यासाठी भगवद्गीतेतील संदर्भ घेतले जाणार आहेत. हा कोर्स विशेषतः वर्किंग प्रोफेशनल्सना समोर ठेवून डिझाइन केला आहे. यामुळे निर्णय घेणे, नेतृत्व, प्रेरणा, धोरण नियोजन, निगोसिएशन, पर्सुएशन आणि टीम बिल्डिंगचे मॅनेजमेंट तंत्र शिकता येणार आहे. पात्रता, फी आणि अर्ज तपशील आयआयएम अहमदाबाद अंडरस्टँडिंग भगवद्गीता कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी, तुमच्याकडे किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आयआयएम अहमदाबादच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता. नोंदणी करण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०२१ आहे. या अभ्यासक्रमाची एकूण फी ६४ हजार रुपये आहे. ऑनलाइन वर्ग या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येणार आहेत. कोर्स २ आठवड्यांचा असेल. १३ डिसेंबर २०२१ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत झूम (ZOOM) च्या माध्यमातून वर्ग घेतले जातील. दर आठवड्याला ६ सत्रे घेतली जातील. लोकांच्या कामाचे वेळापत्रक लक्षात घेऊन, सत्र/वर्ग संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत घेण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, त्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आयआयएम अहमदाबादकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र यासाठी १०० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमादरम्यान कॉर्पोरेट दुनियेत भगवद्गीतेचे धडे कसे लागू करता येतील? याची माहिती आयआयएमचे प्राध्यापक सुनील माहेश्वरी हे देणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l3VYqW
via nmkadda