पुण्यातील २३४ शाळांमध्ये होणार 'एनएएस' सर्वेक्षण Rojgar News

पुण्यातील २३४ शाळांमध्ये होणार 'एनएएस' सर्वेक्षण Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, : देशातील शैक्षणिक परिस्थिती, शिक्षणाच्या पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी करण्यात येणारे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (एनएएस) पुणे जिल्ह्यातील २३४ शाळांमध्ये केले जाणार आहे. २१ नोव्हेंबरला देशभरात हे सर्वेक्षण होणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील २३४ शाळांमधील हजारो मुले विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. केंद्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शैक्षणिक सुविधा तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण केले जाते. यामध्ये महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांपासून ते खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांपर्यंत अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जाते. यासाठी यंदा पुणे जिल्ह्यातील २३४ शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे शहरातील ६० ते ७० शाळांचा समावेश असून पिंपरी-चिंचवडमधील ३० ते ४० शाळांचा समावेश आहे. उर्वरीत या जिल्ह्यातील आहेत. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या चाचणीची तयारी राष्ट्रीय स्तरावर पूर्ण झाली असून, त्या संदर्भातील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम पूर्ण होत आले आहे. २१ नोव्हेंबरला निवड झालेल्या सर्व शाळांमध्ये ही चाचणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी तयारी सुरू केली आहे. दिवाळीनंतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष शाळेत हजर राहण्यास सांगितले जाईल. इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना ही चाचणी द्यावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय शाळा बंद असल्याने शालेय सुविधांवरही त्याचा परिणाम झाला आहे. संपादणूक सर्वेक्षणातून ही सर्व परिस्थिती समोर येऊन शिक्षण क्षेत्राने पुन्हा एकदा उभारी घ्यावी, यासाठी अपेक्षित असलेल्या उपाययोजनाही यामुळे कळतील, असे शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून सांगितले जात आहे. संपादणूक सर्वेक्षणासाठी राज्यातील शाळांची निवड झाली आहे. या सर्वेक्षणामुळे करोनानंतरची शैक्षणिक परिस्थिती काय आहे, याचा अंदाज येईल. विद्यार्थ्यांनी चाचणीमध्ये मांडलेल्या मतांनुसार कल घेणे सोपे जाणार असल्याने या सर्वेक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे असे मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31uQDSh
via nmkadda

0 Response to "पुण्यातील २३४ शाळांमध्ये होणार 'एनएएस' सर्वेक्षण Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel