TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शिक्षक, कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा, बैठकीत 'या' विषयांवर सकारात्मक चर्चा Rojgar News

मुंबई: राज्यातील आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षणविभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि सर्व शिक्षक, पदवीधर आमदार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत वाढीव पदं, संचमान्यता, जुनी पेन्शन, संगणक शिक्षक आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वाढीव पदाबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सकारात्मक भूमिका जाहीर केली. यासोबतच शिक्षक, कर्मचारी यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळाला पाहिजे, शाळा तिथे मुख्याध्यापक पाहिजे आणि कला - क्रीडा शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळाले पाहिजे अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली. शिक्षणमंत्र्यांनी हे मुद्दे मान्य करत तातडीने यासंदर्भात नवीन संचमान्यता लागू करण्याचे आश्वासन दिले. जुनी पेन्शन मिळणार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लावण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचा आदेश शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण आयुक्त यांना दिले आहेत.हा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य केल्यास राज्यातील ३५ हजार शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे. शाळा तिथे संगणक शिक्षण डिजीटल युगामध्ये संगणक शिक्षण अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. कोरोना काळात सुद्धा ऑनलाईन शिक्षणाच्या प्रयत्न केला गेला. यासर्व पार्श्वभूमीवर शाळा तिथे पुर्णवेळ संगणक शिक्षक मिळाला पाहिजे तसेच यापूर्वी कार्यरत शिक्षकांना मान्यता देऊन त्यांच्याही सेवा पुर्वरत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Fgm2GS
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या