Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T07:44:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षण अर्धवट, नोकरी नाही तरी वयाच्या २१ व्या वर्षी ही तरुणी कमावते महिना ५० लाख! Rojgar News

Advertisement
Success Story: सोशल मिडीयावर अलीकडे एका २१ वर्षीय तरुणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारण आहे तिची सक्सेस स्टोरी. अवघ्या २१ व्या वर्षी ही युवती लखपती झाली आहे. तिची कमाई लाखोंमध्ये आहे मात्र तिने हे सर्व पैसे नोकरी सोडल्यावर कमावले आहेत!! असं या तरुणीचं नाव आहे. नोकरी सोडून महिन्याला ५० लाखांहून अधिक पैसे कमावणारी लिली नेमकं काय करते याची अनेकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी लिलीने टिकटॉवर आपली यशोगाथा शेअर केली होती. आपला संघर्षही तिने सर्वांना सांगितला. १९ व्या वर्षी सुरू केली नोकरी एका रिपोर्टनुसार, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या लिलीने युनिव्हर्सिटीतलं शिक्षण सोडून नोकरी करायला सुरूवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी तिने एका रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरूवात केली. तिथे ती साफसफाई देखील करायची. लवकरच तिला या नोकरीचा कंटाळा आला. तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. या दरम्यानच, लिलीला एका फायनान्शिअल एज्युकेशन कंपनीविषयी समजले. या कंपनीद्वारे तिने गुंतवणुकीचे स्मार्ट (smart investment) प्रकार जाणून घेतले. येथूनच लिलीच्या आयुष्यातील बदलाला सुरुवात झाली. नोकरी करता करता तिने इन्व्हेस्टमेंट टेक्निक आणि अन्य बारीकसारिक माहिती आत्मसात केली होती. या कंपनीद्वारे शिकल्यावर तिने नोकरी सोडली आणि तिच्या नशिबाची दारं उघडली. नोकरी सोडल्यानंतर लिलीने स्टॉक मार्केट, क्रिप्टो मार्केट (cryptocurrency), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आदीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. या दरम्यान तिने अन्य अनेक लोकांना हे गुंतुणूकीचं कौशल्य शिकवून खूप पैसे कमावले. हळूहळू तिने हाच व्यवसाय म्हणून निवडला. आज केवळ कमिशनच्या जोरावर ती ऐशोआरामाचे जीवन जगत आहे. लिली लोकांना इन्व्हेस्टमेंट टिप्स देते, बदल्यात कमिशन घेते. ती स्वत: देखील गुंतवणूक करते आणि नेटवर्क मार्केटिंग देखील करते. दहा लाख डॉलर्सच्या व्यवसायाची मालकी दोन वर्ष कठोर मेहनत, चिकाटी, यशापयशाचे चटके खाऊन आज लिलीने हा टप्पा गाठला आहे. आज ती दर महिन्याला ५३ लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच ती १० लाख डॉलर्सच्या ग्लोबल बिझनेसची मालकीण बनील आहे. कमाईचे प्रकार आणि अनुभव यांच्या जोरावर ती लोकांना गुंतवणुकीचे सल्ले देते. योग्य मेंटॉर आवश्यक लिलीने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलंय की प्रत्येकाने आपल्या कौशल्यानुसार योग्य नोरी करायला हवी. आयुष्यात योग्य मेंटॉर किंवा मार्गदर्शकही असावा. तुम्ही तुमच्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्यांना फॉलो करा आणि त्यांच्यासारखी कठोर मेहनत करा. अॅफिलिएट मार्केटिंग, फॉरेक्स आणि क्रिप्टेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी वेळात अधिक कमाई करू शकता, असा सल्लाही लिली देते. टिकटॉकवर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नोकरी सोडून महिन्याला ५० लाखांहून अधिक पैसे कमावणारी लिली नेमकं काय करते याची अनेकांना उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी लिलीने टिकटॉवर आपली यशोगाथा शेअर केली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wt9x7y
via nmkadda