Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-11-09T06:43:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

काश्मीरमध्ये बारावीच्या परीक्षांना सुरुवात, करोना SOP चे होणार पालन Rojgar News

Advertisement
Jammu HSC Exam : काश्मीरमध्ये आजपासून बारावीच्या नियमित परीक्षांना सुरुवात होत आहे. जम्मू बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (BOSE) द्वारे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत साधारण ७४ हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत. बोर्डातर्फे काश्मीरमधील सरकारी आणि खासगी शाळांमध्ये एकूण ७३९ परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा देणार आहेत. 'आम्ही बर्न हॉल स्कूल श्रीनगर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विभागाचे पथक तेथे उपलब्ध असणार असेल', अशी माहिती मंडळाचे सहसचिव प्रा. एजाज हक्क यांनी दिली. तसेच मुलांसोबत परीक्षा केंद्रावर येणाऱ्या पालकांसाठी विश्रांतीची सोयही करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्य कार्यकारिणी समितीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोना प्रोटोकॉलचे पूर्ण पालन करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आलेल्या शाळांच्या प्रमुखांना सरकारने जाहीर केलेल्या सर्व करोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षा हॉलमध्ये पुरेसे तापमान आणि प्रकाश व्यवस्था ठेवण्याच्या सूचना संस्था प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या प्रत्येक दिवशी पालकांची संमती घेणे आवश्यक असल्याचे निर्देश जम्मू आणि काश्मीर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या राज्य कार्यकारी समितीने आधीच दिले आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा हॉलमधील परीक्षार्थींमध्ये योग्य अंतर राखण्यात येणार आहे. योग्य अंतर राखण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये फक्त ५० टक्के मुलांना बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दहावी ते बारावीच्या वार्षिक परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डातर्फे आधीच अभ्यासक्रमात ३० टक्के शिथिलता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतून ७० टक्के गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. निकालाच्या वेळी तोच १०० टक्के ग्राह्य धरला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3H3568o
via nmkadda