नीट काऊन्सेलिंग: OCI उमेदवारांच्या सहभागाबद्दल SCचे महत्वाचे निर्देश Rojgar News

नीट काऊन्सेलिंग: OCI उमेदवारांच्या सहभागाबद्दल SCचे महत्वाचे निर्देश Rojgar News

NEET counseling: सर्व परदेशी भारतीय नागरिकांना (OCI) पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट काऊन्सेलिंगच्या जनरल कॅटेगरीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला. दरम्यान ही अंतरिम सवलत केवळ शैक्षणिक सत्र २०२१-२२ पुरती मर्यादित असल्याचे न्या. एसए नझीर आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. 'अर्जदार आणि इतर सर्व पात्र उमेदवारांना भारतीय नागरिकांप्रमाणेच मान्यताप्राप्त वैद्यकीय/डेंटल मेडिकल आणि इतर संस्थांमधील एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रम आणि इतर अंडरग्रॅजुएट/पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी काऊन्सेलिंगमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी असेल' असे खंडपीठाने म्हटले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि समुपदेशन केंद्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यास बांधील आहेत असे खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना सांगितले. दरम्यान खंडपीठाने कलम १४४ चा हवाला देत, सर्व नागरी आणि न्यायिक प्राधिकरणांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी असे म्हटले. त्यानंतर दिलासा फक्त याच याचिकाकर्त्यांपुरता मर्यादित ठेवावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला केली. अर्जांच्या ढिगाऱ्यात आपण अडकून पडू असे मेहता म्हणाले. ओसीआयची स्थिती वेगळी असल्याने त्यांची तुलना सामान्य श्रेणीसोबत केली जाऊ शकत नाही असे मेहता यावेळी म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात ठेवली आहे. OCI उमेदवारांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नीटमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवासी भारतीयांप्रमाणे (NRIs) ओसीआय उमेदवारांना सहभाग दिला जावा या गृह मंत्रालयाच्या नोटिफिकेशनला आव्हान देण्यात आले. त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. ऑनलाइन अर्ज NEET २०२१ ची कट ऑफ क्लिअर केलेले उमेदवार १५ टक्के ऑल इंडिया जागांसाठी अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर आणि आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी aaccc.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांना बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (BHMS), बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS), बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन अँड सर्जरी (BAMS) आणि बॅचलर ऑफ सिद्ध मेडिसिन अँड सर्जरी (BSMS) कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल. ऑनलाइन काऊन्सेलिंगसाठी उमेदवारांना विहित शुल्क देखील भरावे लागेल. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह इतर राज्यांमध्ये नीट २०२१ काऊन्सेलिंगच्या आयोजनाबाबत कोणतीही माहिती स्टेट काऊन्सेलिंगनी दिली नाही. काऊन्सेलिंग फेरीमध्ये सहभागी होणारे उमेदवार अपडेट माहितीसाठी अधिकृत वेबसाइट mcc.nic.in ला भेट देऊ शकतात. तसेच महत्वाच्या अपडेटसाठी. nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kj6bzl
via nmkadda

0 Response to "नीट काऊन्सेलिंग: OCI उमेदवारांच्या सहभागाबद्दल SCचे महत्वाचे निर्देश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel