UPSC Mains: नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरुवात Rojgar News

UPSC Mains: नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरुवात Rojgar News

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission)मुख्य परीक्षा २०२१ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म (DAF)जारी करण्यात आला आहे. उमेदवारांसाठी या अधिकृत संकेतस्थळावर हा फॉर्म उपलब्ध झाला आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षा २०२१ मध्ये पात्र ठरले आहेत, त्यांना १ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत DAF ऑनलाइन भरायचा आहे. जे उमेदवार यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी DAF भरणार नाहीत, त्यांना जानेवारी महिन्यात होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून वंचित राहावे लागेल. यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रासंदर्भात एक महत्त्वाची सूचना आयोगाने १७ नोव्हेंबर रोजी जारी केली होती. यूपीएससी उमेदवारांना एक संधी म्हणून परीक्षा केंद्रात बदल करण्याची संधी देण्यात आली होती. Mains DAF भरतानाच परीक्षा केंद्राचा पसंतीक्रम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की DAF अंतिम समजले जाईल. एकदा DAF भरून सबमिट केल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. यूपीएससी सिव्हील सेवा मुख्य परीक्षा ७, ८, ९, १५ आणि १६ जानेवारी २०२२ अशी पाच दिवस चालणार आहे. ही परीक्षा ७ जानेवारी २०२१ रोजी सुरू होईल. ७ जानेवारी ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. जानेवारीला मुख्य परीक्षा होईल. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. DAF काय आहे? UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी (UPSC Civil Services)वेगवेगळ्या स्तरावर अर्ज भरले जातात. उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी आधी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी एक फॉर्म भरावा लागेल. याला तपशीलवार अर्ज फॉर्म (UPSC DAF 1) म्हणतात. यासोबतच परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी यूपीएससी डिएएफ २ भरावे लागेल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.


UPSC मार्फत नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 [DAF] UPSC Civil Services Recruitment 2021

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3oRBZwE
via nmkadda

0 Response to "UPSC Mains: नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरुवात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel