TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

शाळा बंद असल्याने लिंग समानतेला धोका; 'युनेस्को'च्या अभ्यासातील निष्कर्ष Rojgar News

वृत्तसंस्था, नवी दिल्ली करोनामुळे जगभरात दीर्घकाळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नुकसानच झालेले नाही, तर लिंग समानतेलाही धोका निर्माण झाला आहे, असे 'युनेस्को'च्या अहवालात म्हटले आहे. 'व्हेन स्कूल्स शट : जेंडर्ड इम्पॅक्ट्स ऑफ कोव्हिड १९ स्कूल क्लोजर' हा जागतिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. शाळा बंद असल्याचा परिणाम लहान मुले आणि मुली, तरुण मुले आणि मुली यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. 'कोव्हिड-१९ साथ सर्वोच्च पातळीवर असताना १९० देशांतील एक अब्ज ६० कोटी विद्यार्थ्यांना शाळा बंदचा फटका बसला. यात त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, तसेच शाळांत उपस्थित राहण्यापासून वंचित राहावे लागले,' असे 'युनेस्को'च्या सहायक शिक्षण सरचिटणीस स्टेफानिया गियानिनी यांनी म्हटले आहे. 'या संदर्भात शैक्षणिक अस्थिरतेचे मोठे परिणाम झाले आहेत. त्यामध्ये अध्ययनातील नुकसान आणि शिक्षण थांबण्याचे प्रकार घडले आहेत. याशिवाय मुलांच्या लिंग समानतेलाही धोका निर्माण झाला असून, आरोग्य, जीवनमान आणि संरक्षण यावरही परिणाम झाला आहे,' असेही त्यांनी नमूद केले. जगातील ९० देशांतील स्थानिक समुदायांतील तपशीलवार माहितीच्या आधाराने हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. दूरस्थ शिक्षणावर विविध देशांतील नियमांचा परिणाम झाल्याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. शिक्षणाचा वेळ घटला घरातील विविध कामांमुळे मुलींच्या शिक्षणाचा वेळ कमी झाला आहे. उत्पन्न मिळवण्यासाठीच्या कामांत गुंतल्याने मुलांचा शिक्षणातील सहभाग मर्यादित झाला आहे. डिजिटल दूरस्थ शिक्षणाच्या साधनांशी जुळवून घेताना मुलींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये इंटरनेटवर आधारित उपकरणांची मर्यादित उपलब्धता, डिजिटल कौशल्यांची कमतरता आणि सांस्कृतिक दडपणामुळे तांत्रिक उपकरणे हाताळण्यात मुलींना मर्यादा पडत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. डिजिटल लिंग असमानता करोनापूर्व काळातही चिंतेचा विषय होता, याकडेही अहवालात लक्ष वेधले आहे. अभ्यास काय सांगतो? - बांगलादेश आणि पाकिस्तानात शाळा बंद असल्याने लिंग समानतेला धोका उत्पन्न झाला. - पाकिस्तानातील अभ्यासात सहभागी जिल्ह्यांमध्ये ४४ टक्के मुलींकडे, तर ९३ टक्के मुलांकडे मोबाइल फोन उपलब्ध आहे. - स्वत:कडे मोबाइल फोन नसलेल्या मुलींना शिक्षणासाठी नातेवाइकांच्या विशेषत: वडिलांच्या मोबाइल फोनवर अवलंबून राहावे लागले. - मोबाइलचा गैरवापर होईल या भीतीने अनेक पालकांनी त्यांच्या मुलींना तो दिला नसल्याचे प्रकारही घडले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4MFuF
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या