TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

aima: मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्टसाठी अॅडमिट कार्ड करा डाऊनलोड, ५ डिसेंबरला परीक्षा Rojgar News

देशभरातील विविध मॅनेजमेंट संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी मॅनेजमेंट अॅप्टिट्यूड टेस्ट (MAT)आयोजित करण्यात येते. या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी डिसेंबर २०२१ सत्रात सहभागी होण्यासाटी अॅडमिट कार्ड बुधवार १ डिसेंबर २०२१ पासून डाऊनलोडसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. एआयएमए द्वारे मॅट २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोडची लिंक परीक्षा पोर्टल, वर अॅक्टिव केली जाईल. परीक्षेच्या तारखेपर्यंत हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील. स्टेप बाय स्टेप पद्धतीने करा डाऊनलोड - उमेदवारांना आपलं मॅट २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. - त्यानंतर होम पेज वरच अॅक्टिव केलेल्या संबंधित लिंक वर क्लिक करावं लागेल. - नव्या पेज वर आपला लॉग-इन आयडी, पासवर्ड आदी माहिती भरून सबमीट करावे. - यानंतर उमेदवारांना आपले प्रवेशपत्र स्क्रीन वर दिसेल. - भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट अवश्य घेऊन ठेवा. ५ डिसेंबर रोजी परीक्षा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) द्वारे एमएटी किंवा मॅट 2021 ची पेपर बेस्ड टेस्ट (PBT)चे आयोजन ५ डिसेंबर २०२१ रोजी केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षेत सहभागी होण्यासाठी रोल नंबर, परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, सत्राची वेळ आदी आवश्यक निर्देश एआयएमए मॅट २०२१ अॅडमिट कार्डद्वारे मिळू शकतील. एआयएमए एमएटी पीबीटी 2021 साठी रजिस्ट्रेशनची अखेरची मुदत २ डिसेंबर २०२१ दुपारी १ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी पोर्टलवर लॉग इन करून परीक्षेसाठी नोंदणी करता येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DdD7Q6
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या