Animal Husbandry विभागातील प्रलंबित परीक्षा तातडीने घेण्याची युवासेनेची मागणी Rojgar News

Animal Husbandry विभागातील प्रलंबित परीक्षा तातडीने घेण्याची युवासेनेची मागणी Rojgar News

examination: पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून (Animal Husbandry Department) घेण्यात येणाऱ्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदभरती परीक्षा () तातडीने घेण्याची मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१७ आणि २०१९ मध्ये नोटिफिकेशन (Animal Husbandry Department Recruitment Notification) प्रसिद्ध करण्यात आले पण परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. पदभरती बाबत विद्यार्थ्यांना अद्याप एकही सूचना न मिळाल्याने चिंतेचे वातावरण आहे. ही पदभरती तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे सहचिव कल्पेश यादव यांनी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.डी.रजपूत यांच्याकडे केली आहे. यादव यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत पशुसंवर्धन आयुक्तालय येथे भेट घेतली. प्रलंबित पदभरतीबाबत वित्त विभागकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच ही पदभरती तातडीने पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. पदभरती पूर्ण होण्यासाठी पशुसंवर्धन विभाग पूर्णतः प्रयत्नशील असल्याचे रजपूत यावेळी म्हणाले. पशुसंवर्धन विभागाने २०१७ साली प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीला जवळपास चार वर्ष होत आली आहेत. याबाबत अद्याप एकही सूचना विद्यार्थ्यांना मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. तसेच मेगाभारती आणि जिल्हापरिषद पदभरती सन २०१९ ची पदभरती ऑगस्ट २०१९ घेण्यात येणार होती पण अतिवृष्टीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यांनंतर पुन्हा या परीक्षा डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात येणार होत्या पण त्या देखील परीक्षा रद्द करण्यात आल्या. यानंतर करोना प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्याबाबत प्रशासनाने विचार केला नाही. तीन वेळा प्रवेशपत्र येऊन ही परीक्षा घेतली गेली नाही. याचा परिणाम पशुसंवर्धन विभागावर देखील पडत असून तिथे मनुष्यबळ अपुरे पडून प्रचंड ताण निर्माण होत असल्याचे यादव यांनी सांगितले. परीक्षार्थी विद्यार्थी देखील प्रचंड तणावातून जात आहेत. एकीकडे परीक्षेची तयारी पूर्ण करून देखील परीक्षा होत नाही तर दुसरीकडे याबाबतची कुठलीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही ही बाबत चिंतेची आहे. यावर विभागाने चिंतन करायला हवे. तसेच ही पदभरती पूर्ण होण्यासाठी वित्त विभागाकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे यादव म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31CzuGu
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "Animal Husbandry विभागातील प्रलंबित परीक्षा तातडीने घेण्याची युवासेनेची मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel