Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ८ डिसेंबर, २०२१, डिसेंबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-12-08T08:43:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career Newsjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मास्कच्या आत सिमकार्ड स्लॉट आणि माईकही! पोलीस भरती परीक्षेत 'अशी' झाली भन्नाट कॉपी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत (Police Recruitment Exam Copy) मास्कमध्ये मोबाइल डिव्हाइस बसवून 'मुन्नाभाई स्टाइल' कॉपी करणाऱ्या दोघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (दहा डिसेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी मास्कमध्ये बसविलेले मोबाइलचे पार्ट कोठून मिळवले, कोणी ते जोडले, मोबाइलवर प्रश्नांची उत्तरे कोण देणार होते याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. नितीन जगन्नाथ मिसाळ (वय २६) आणि रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय २४, दोघेही रा. औरंगाबाद) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर संबंधित परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक शशिकांत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास हिंजवडी परिसरातील परीक्षा केंद्रावर घडली. हिंजवडी पोलिसांनी या आरोपींना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आरोपींचे अन्य साथीदार आहेत का, त्यांनी अशा पद्धतीने कॉपी करून कोठे परीक्षा दिली आहे का, अशा पद्धतीचे कोणते 'रॅकेट' आहे का याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. असा होता आरोपींचा मास्क आरोपींनी परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या मास्कच्या आतील बाजूस एका कंपनीची बॅटरी लावण्यात आली होती. या बॅटरीच्या बाजूला काळ्या रंगाच्या वायरने जोडून 'सी टाइप चार्जिंग पॉइंट' काढण्यात आला होता. तीच वायर डाव्या बाजूला आणून अन्य काळ्या व लाल रंगाच्या वायरद्वारे सिम कार्डच्या स्लॉटला जोडण्यात आली होती. त्यामध्ये सिम कार्ड टाकण्यात आले होते. बाजूला माइक जोडण्यात आला होता. त्यावर माइक चालू-बंद करण्यासाठीटे बटण लावण्यात आले होते. सोबत कानात वापरण्यासाठी दोन मायक्रो स्पीकर व मॅग्नेट रॉड जोडण्यात आले होते. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lKHaNU
Source https://ift.tt/310mqee