TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

'अटल रँकिंग ऑफ इनोव्हेशन'मध्ये पुणे विद्यापीठ देशात आठवे

म. टा. प्रतिनिधी, पुणे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'अटल' ( achievements) या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारीत सावित्रीबाई फुले ाने देशात आठवे स्थान मिळवले आहे. राज्य पातळीवरील विद्यापीठांमध्ये विद्यापीठाला पहिले स्थान मिळाले आहे. विद्यापीठातील नवोपक्रम केंद्राने केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळवल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये नवनव्या संकल्पना राबवून उद्योजकता विकास होण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे (AICTE) जाहीर केले जाते. २०२१ शैक्षणिक वर्षात देशातील १४३८ शिक्षणसंस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला होता. त्यामध्ये आयआयटी, एनआयटी आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली. गेल्या वर्षभरात विद्यापीठामध्ये स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इनोव्हेशन पार्क, आयआयटी खरगपूर, आयआयटी मुंबई, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, व्हेंचर सेंटर अशा अनेक संस्थांसोबत विद्यापीठाने संयुक्त उपक्रम राबवले. अनेक छोट्या व मोठ्या कालावधीचे अभ्यासक्रमही सुरू केले. सातत्याने प्राध्यापकांना प्रशिक्षित केले. विद्यापीठात सात एक्सलन्स सेंटर आहेत. विद्यापीठात नवोपक्रम व उद्योग या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडले गेले आहे. सध्या विद्यापीठात ४० स्टार्टअप सुरू असून, ३४० संलग्न महाविद्यालयांत 'इनोव्हेशन सेल' स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देशात आठवे स्थान मिळाले आहे, अशी माहिती इनोव्हेशन विभागाच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली आहे. ----------------- विद्यापीठाने कॅम्पसवर व संलग्न महाविद्यालयात नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठीच 'इनोव्हेशन सेल'ची स्थापना विद्यापीठात केली आहे. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अटल क्रमवारीत मिळालेले हे स्थान विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे. - प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


source https://maharashtratimes.com/career/career-news/sppu-pune-university-ranks-8th-in-india-in-atal-ranking-of-institutions-on-innovation-achievements-2021/articleshow/88595152.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या