TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्ज

SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुकांसाठी मोठी संधी आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने २४ डिसेंबर २०२१ पासून विविध विभागांमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार sbi.co.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ जानेवारी २०२२ आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात: २४ डिसेंबर २०२१

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १३ जानेवारी २०२२

रिक्त पदांची संख्या

असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) – ४ पदे

मुख्य व्यवस्थापक (कंपनी सेक्रेटरी) – १ जागा

व्यवस्थापक (SME प्रोडक्ट्स) – १ पद

डीवाय. व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटेंट) – १ पद

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग आणि कम्युनिकेशन)- उमेदवाराकडे पूर्णवेळ एमबीए (मार्केटिंग)/पीजीडीएम किंवा त्याच्या समकक्ष, सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थांमधून मार्केटिंगमधील स्पेशलायझेशन असणे आवश्यक आहे.

मुख्य व्यवस्थापक (कंपनी सेक्रेटरी) – या पदासाठी उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा सदस्य असावा.

व्यवस्थापक (SME प्रोडक्ट्स) – MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्ण वेळ B.E/B. पाहिजे.

डीवाय. व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट) – या पदासाठी उमेदवाराला चार्टर्ड अकाउंटंट असणे अनिवार्य आहे.

वय किती?

असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) – ३० वर्षे

मुख्य व्यवस्थापक (कंपनी सचिव) – ४५ वर्षे

व्यवस्थापक (SME प्रोडक्ट्स)- ३५ वर्षे

डीवाय. व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट) – ३५ वर्षे

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवार २४ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासह, सामान्य / EWS / OBC उमेदवारास ७५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिकृत सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

The post SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्ज appeared first on Loksatta.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SBI Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी, ‘असा’ करा अर्जhttps://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या