
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई विधिज्ञांची वाढती मागणी लक्षात घेत विधी अभ्यासक्रमालाही मागणी वाढली आहे. यावर्षी एलएलबी तीन वर्ष या अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १६७ अर्ज आले आहेत. गतवर्षी करोनामुळे ही संख्या कमी होती. विधी क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांचा कायदेविषयक अभ्यासक्रम (एलएलबी) किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाकडे लक्ष वेधत आहेत. गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणी कमी दिसली. यंदा सुमारे नोंदणीत ६ हजारांनी वाढ झाली आहे. एलएलबी अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याचे दिसून येते. यावर्षी एलएलबी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ४६ हजार १६७ अर्ज आले होते. त्यापैकी प्रवेशात ४२ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. तर पहिल्या फेरीसाठी ४१ हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांचे पसंतीक्रम भरल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/increase-in-registration-of-law-courses/articleshow/88584113.cms
0 टिप्पण्या