Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-12-27T08:00:55Z
Rojgar

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी नोंदणीला २८ डिसेंबरपासून

Advertisement
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्या 'परीक्षा पे चर्चा २०२२' कार्यक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होत आहे. ज्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना २०२२ कार्यक्रमात () सहभागी व्हायचे आहे, ते २८ डिसेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. पीएमओ द्वारे यासंबंधी ट्वीट करण्यात आले आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना परीक्षा पे चर्चा २०२२ कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी एका स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. पीएमओ द्वारे ट्वीट करून असं म्हटलं आहे की इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. वेबसाइट MyGov.in वर जाऊन नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एका ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमांतर्गत देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात चर्चाच करतात. पुढील वर्षी २०२२ मध्ये बोर्ड परीक्षांआधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात सांगितले होते की, विद्यार्थ्यांवर आई-वडिल, शिक्षक आणि अन्य कोणी दबाव टाकू नये. असे केल्याने विद्यार्थी मोकळ्या मनाने, कोणत्याही दबावाशिवाय परीक्षा देतील. विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव नसेल तर त्यांच्या मनातून परीक्षेची भिती कमी होईल. आई-वडिलांनी मुलांच्या क्षमता समजून घेऊन त्याकडे लक्ष द्यायला हवे. मुलांसाठी एक निकोप वातावरण तयार करायला हवं. पीएम मोदी यांनी विद्यार्थ्यांशी देखील गेल्या वर्षी या कार्यक्रमात संवाद साधला होता, ते म्हणाले की काही विषय न आवडणे किंवा ते कच्चे असणं ठीक आहे. पण त्याला अपयश समजू नका. यशस्वी ते असतात जे आपल्या बलस्थानांकडे लक्ष केंद्रित करतात. कठीण विषयांकडे लक्ष देऊन ते विषय म्हणजे एक आव्हान समजा.


source https://maharashtratimes.com/career/career-news/pariksha-pe-charcha-registration-for-prime-minister-narendra-modi-pariksha-pe-charcha-will-start-from-december-28/articleshow/88517678.cms