Government Job 2021: खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीत विविध पदांची भरती

Government Job 2021: खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीत विविध पदांची भरती

KVIC Recruitment 2021: भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीत (, KVIC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत यंग प्रोफेशनल पदाच्या (Young Professional Post) रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीत यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण १८ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये केमिस्ट्री पदाच्या २, बायोलॉजी पदाच्या २, झूलॉजी अॅनाटॉमी पदाची १, ट्रेनिंगच्या ४ आणि लीगलच्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी शिक्षण, अनुभव आणि परफॉर्मन्सच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५,०० ते ३०, ००० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची निवड १ वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. हा कालावधी ३ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, पुणे आणि नाशिक येथे पोस्टिंग दिली जाणार आहे. उमेदवारांना एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटची माहिती असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे लिखाण आणि संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज अधिकृत वेबसाइट www.kvic.gov.in. वरील वॅकेन्सी सेक्शनमध्ये जाऊन भरायचा आहे. ९ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/kvic-recruitment-2021-vaious-post-vacant-in-khadi-and-village-industries-know-details-for-government-job/articleshow/88357610.cms

0 Response to "Government Job 2021: खादी आणि ग्रामोद्योग इंडस्ट्रीत विविध पदांची भरती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel