Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २८, २०२१ WIB
Last Updated 2021-12-28T12:00:30Z
Rojgar

Government Job: GAIL मध्ये विविध पदांची भरती, २ लाखांपर्यंत मिळेल पगार

Advertisement
Recruitment 2021 : गेलमध्ये सरकारी नोकर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध विभागांमध्ये भरती आहे. गेलमध्ये वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. याद्वारे पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, व्हिजिटिंग सोनोलॉजिस्ट आणि एंडोक्राइनोलॉजिस्टच्या ०७ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता पॅथॉलॉजिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमसीआयद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडे क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये एमडी / डिप्लोमा देखील असावा. वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी (Medial officer Recruitment) उमेदवाराने MCI मान्यताप्राप्त संस्थेतून AFIH (Associate Fellow of Industrial Health)पदवी (MBBS) असणे आवश्यक आहे. सोनोलॉजिस्ट (Sonologist Recruitment) पदासाठी, उमेदवाराने एमसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी (रेडिओलॉजी)/डीएमआरडीसह एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. एंडोक्रिनोलॉजिस्ट (Endocrinologist Recruitment)पदांसाठी, उमेदवाराकडे एमसीआयद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे एंडोक्राइनोलॉजीमध्ये डीएम पदवी देखील असावी. वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत ३ वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्ज शुल्क सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी २०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. पगार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजार ते २ लाख ४० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. निवड प्रक्रिया ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या मुदतीपर्यंत अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन भरायचा आहे. यासाठी अर्ज प्रक्रीया २२ डिसेंबरपासून सुरु झाली असून उमेदवारांना २० जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


source https://maharashtratimes.com/career/career-news/gail-recruitment-2022-bumper-vacancies-in-gail-know-details-of-government-job/articleshow/88543872.cms