CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Registration: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने विद्यार्थ्यांकडून मेरिट स्कॉलरशिप स्कीम फॉर सिंगल गर्ल चाइल्डसाठी ( Scholarship) अर्ज मागविले आहेत. यासोबतच २०२० मध्ये सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई मेरिट स्कॉलरशिप स्कीमच्या ऑनलाइन अर्जांचे नूतनीकरण करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून १७ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. याचे पात्रता निकष आणि अर्ज बोर्डाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. पात्रता निकष सीबीएसईने सिंगल गर्ल चाईल्ड (ज्या मुली पालकांच्या एकुलत्या एक आहेत म्हणजेच त्यांना कोणी भाऊ बहिण नाही) कडून अर्ज मागविले आहेत. इयत्ता दहावीमध्ये मध्ये अर्जदाराची शैक्षणिक फी १५०० रुपयांपेक्षा जास्त नसावी. सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशीप मिळण्यासाठी सीबीएसईच्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून पास होणे गरजेचे आहे. यासोबतच दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यासोबतच अकरावी किंवा बारावीचे शिक्षण सुरु असणे आवश्यक आहे. ज्या शाळेमध्ये सिंगल गर्ल चाइल्ड शिकत असेल त्या शाळेची ट्युशन फी दरमहा १५०० रुपयांपेक्षा जास्त नसावी. असा करा अर्ज इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या अविवाहित विद्यार्थिनी खालील प्रकारे अर्ज करू शकतात. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर जा. खाली स्क्रोल करा आणि होमपेजवरील स्कॉलरशिपच्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर स्कॉलरशिप स्कीम फॉर सिंगल गर्ल चाइल्ड २०२० लिंकवर क्लिक करा. अर्ज डाउनलोड करा, भरा आणि सबमिट करा. भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपीची प्रिंट आउट घ्या. किती शिष्यवृत्ती मिळेल? मुलींना २ वर्षांसाठी दरमहा ५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या मुली पहिल्या वर्षी यासाठी अर्ज करतात त्यांना पुढील वर्षी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी शिष्यवृत्ती अपडेट करणे गरजेचे असते.


source https://maharashtratimes.com/career/career-news/scholarship-registration-begins-for-cbse-single-girl-child-scholarship-see-complete-details-here/articleshow/88536744.cms

0 Response to "CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी नोंदणी सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel