TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

NEET PG Counselling: ६ जानेवारीपूर्वी सुरू होणार नीट पीजी काऊन्सेलिंग

Schedule Updates: च्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. नीट पीजी २०२१ अॅडमिशन (NEET PG admission)साठी काऊन्सेलिंग प्रक्रिया ६ जानेवारी २०२२ च्या पूर्वी सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya)यांनी इंडियन मेडिकल एसोसिएशनला ()हे आश्वासन दिले आहे. आयएमए प्रेसिडेंट सहजानंद प्रसाद सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आयएमएने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आंदोलनकर्त्या ज्युनिअर डॉक्टरांविरुद्ध दाखल एफआयआर बिनशर्त मागे घेण्याचे आवाहन केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितले की या डॉक्टरांविरुद्ध कोणतीही एफआयआर दाखल होणार नाही. आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष (IMA President) सहजानंद प्रसाद सिंह (Sahajanand Prasad Singh) यांनी ३० डिसेंबर २०२१ रोजी अन्य सदस्यांसह केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. आरोग्यमंत्र्यांना यावेळी मेडिकल पीजी कोर्सेसमधील प्रवेशांना होणाऱ्या विलंबावर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले. आयएमएने म्हटले आहे की‘हजारो डॉक्टर एक वर्ष किंवा अधिक काळापासून मेडिकल पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची वाट पाहत आहेत. कोविड महामारीमुळे या प्रवेश प्रक्रियेला सातत्याने विलंब होत आहे. तूर्त ओमिक्रॉन वेरिएंट (Omicron)मुळे करोनाची तिसरी लाट (Covid 3rd Wave) वाढत आहे, अशावेळी रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी निवासी डॉक्टरांनी संप करणं दुर्दैवी आहे. या डॉक्टरांनी नीट पीजी परीक्षेची (NEET PG Exam)तयारी करत असतानाच कोविड महामारी दरम्यान आरोग्य सेवेत आपले पूर्ण योगदान दिले आहे.’


source https://maharashtratimes.com/career/career-news/neet-pg-counselling-2021-to-start-before-6-january-2022-health-minister-assures-ima-doctors/articleshow/88616537.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या