TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात बंपर भरती, १ लाखापर्यंत मिळेल पगार Rojgar News

BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेश जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ही पदभरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत ३४ विभागांमध्ये एकूण १६४ जागा भरण्यात येणार आहेत. विभागानुसार रिक्त पदांची संख्या आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. उमेदवाराकडे नॅशनल मेडीकल कमिशन अंतर्गत शिक्षक पात्रता आणि मेडीकल इंस्टिट्यूशन रेग्युलेशन २०२१ तसेच टीईटी रेग्युलेशन २०२१, १४ ऑगस्टनुसार शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच सुपर स्पेशालिटी डीए/एमसीएच, एमडी/एमएस,डीएनबी तसेच संबंधित विषयाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासोबतच एमएससीआयटी आणि मराठी भाषेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही पदभरती ३ जानेवारी ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी असणार आहे. या पदांसाठी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच उमेदवारांकडून ५२५ रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८० हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- ४०००२२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. १० डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मुलाखतीच्या संदर्भातील अपडेट नायर हॉस्पीटलच्या नोटीसबोर्डवर लावण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IjMZM8
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या