TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

इंजिनीअरिंग प्रवेशांना फटका; मुदतवाढीची मागणी Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने () इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना मंगळवारी ७ डिसेंबर रोजी प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, एसटी संप, ओमायक्रॉनचा धोका आदींमुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी संबंधित कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याने प्रवेश घेण्याला अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे कॉलेजांमध्ये प्रवेश निश्चिती मुदतवाढ देण्याची मागणी पुढे आली आहे. राज्य सीईटी सेलमार्फत विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. यात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. यंदा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी एक लाख सात हजार ७३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी इंजिनीअरिंग कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना चार ते सात डिसेंबर या कालावधीत प्रवेश घेण्याची सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे जमा करून रिपोर्टिंग सेंटरद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे. पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना ७ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित न केल्यास, प्रवेश रद्द होणार आहे. सध्या राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने, एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवेशासाठी कॉलेज अॅलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती कॉलेजांमध्ये पोहोचता येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. खासगी वाहनेही उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. त्याचप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण-डोंबिवली परिसरात 'ओमायक्रॉन'चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक द्विधा मनस्थितीत आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZW7AVk
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या