TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

मराठी बालवाडीकडे विद्यार्थ्यांची पाठ, शिक्षिकांची घरोघरी जाऊन विनवणी Rojgar News

जान्हवी पाटील, ठाणे: एकीकडे सरकारसह अनेक संस्था मायमराठी टिकण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतानाही, गेल्या तीन वर्षांत ठाणे महापालिकेच्या मराठी बालवाडीसाठी विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती आहे. करोनाच्या संसर्गामुळे ठाणे महापालिकेच्या शाळांची परिस्थिती बिकट बनली आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे ओढा वाढू लागल्याने पालिकेच्या मराठी बालवाडीकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. ठाणे पालिकेच्या हद्दीत एकूण ६७ बालवाड्या असून गेल्या वर्षी तर एकही प्रवेश झालेला नाही. यंदा ६३१ प्रवेश झाल्याचे पालिकेच्या अहवालावरून दिसत आहे. तरीही, एका शाळेत जेमतेम १० विद्यार्थीदेखील मिळत नसल्याची परिस्थिती असल्याचे शिक्षिकेने सांगितले. करोनाकाळात शिक्षण क्षेत्राची विचित्र कोंडी झाली आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा अजूनही तग धरून आहेत. पालकांचा दिवसागणित इंग्रजी शाळांकडे ओढा वाढत आहे. हे लक्षात घेऊन पालिकेने सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू केले. सेमी इंग्रजीसाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साडेचारशेच्या घरात असली, तरी मराठी बालवाडीसाठी मात्र दहा विद्यार्थीही शोधून आणवे लागत आहेत. ठाणे महापालकेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा १२४ शाळा आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये बालवाडीच्या वर्गासाठी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध होत्या. पण प्रत्यक्षात लहान शिशु वर्गासाठी केवळ ६३१ विद्यार्थी मिळाले असल्याचे पालिकेच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येकी बालवाडीसाठी सुमारे आठ ते १० विद्यार्थीच मिळाले असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना असूनहीदेखील आज मराठी शाळा टिकविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागत आहेत. मात्र तरीही परिस्थिती फारशी वेगळी दिसून येत नाही. मराठी शाळा टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गतवर्षी म्हणजेच, सन २०२०-२१च्या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक म्हणजेच बालवाडीच्या वर्गात एक हजाराहून अधिक जागा असतानाही एकाही विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला नाही, ही धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे. यावरून इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोकमान्य नगरमधील बालवाडीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा घरोघरी जाऊन शोध घ्यावा लागत आहे. अनेक पालक मराठी बालवाडीसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक नाहीत. त्यांची मनधरणी करून २०२१-२२ साठी कसेबसे १० विद्यार्थी मिळविले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये सर्वांनाच इंग्रजीमध्ये शिक्षण घ्यायचे असल्याचे ठाण्यातील एका शिक्षिकेने सांगितले. करोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये बालवाडीचे प्रवेश फार झाले नाहीत. सध्या सर्वत्र लोकांची मानसिकता ही इंग्रजीकडे आहे. त्यामुळे मुलांना आकर्षित करण्यासाठी पालिकेच्या मराठी शाळांमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. करोनामुळे काही इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्याची प्रतिक्रिया ठाणे पालिकेतील शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. २०१९-२० मध्ये बालवाडीची पटसंख्या ८९८ होती, २०२० मध्ये २१ ० तर २०२१-२२ मध्ये ६३१ इतकी संख्या झाली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dyC6aV
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या