TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रवेश होत नाहीत तोच परीक्षा जाहीर; मराठवाडा विद्यापीठाच्या यूजी, पीजी परीक्षा फेब्रुवारीत Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (, ) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची () प्रवेश प्रक्रिया संपत नाही तोच परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. संभाव्य तारखानुसार बीए, बीएससी, बीकॉम पदवी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून तर पदव्युत्तर परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबर रोजी संपली. प्रवेशाची प्रक्रिया संपली तोच विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे. विद्यापीठा अंतर्गत चार जिल्ह्यांत महाविद्यालयांची संख्या ४६३ आहे. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांची संभाव्य तारीख विद्यापीठाने जाहीर केली असून, आठ व १६ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात परीक्षा सुरू होणार आहे. बीए, बीएस्सी, बीकॉम अशा पदवी अभ्यासक्रमांसाठी परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली. काही पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. वेळापत्रकानुसार बहुतांशी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आहे. करोनामुळे प्रवेशाची प्रक्रिया लांबली. नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रवेश देण्यात आले. त्यानंतर लागलीच दोन महिन्यांतच पदवी परीक्षा होणार असल्याने सत्रासाठी निश्चित करण्यात आलेला कालावधी पूर्ण होत नसल्याचेही काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक सत्रासाठी ९० दिवसांचा कालावधी असणे आवश्यक असते. परंतु मुदतवाढ देताना कॉलेजांनी अधिकचे तासिका घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे हमी पत्र दिले, त्यामुळे परीक्षा नियोजित वेळेत होतील असेही परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले. कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा? - शिक्षणशास्त्र शाखेतील बीएड, बीएड (स्पेशन एज्युकेशन), एमएड प्रथम ते चौथे सत्र, बीपीएड, बीपीई, एमपीएड अभ्यासक्रमाची परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. - पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एमए, एमएस्सी, एमएएमसीजे, एमकॉम, एमलीब, एमएफए अशा दहा अभ्यासक्रमासह व्यवस्थास्पनशास्त्रातील डीबीएम, डीसीए, बीसीएम, एमसीएम, एमपीएम, एमसीए, एमबीए, एमएमएस व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेतील बीई, आर्किटेक्चर, बीटेक, एमटेक, बीफार्मसी, एमफार्मसी, फार्मडी, एमई, एमसीए अभ्यासक्रमाची परीक्षा १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. - बीए, बीएससी, बीकॉम, एकात्मिक बीए, बीएससी, बीकॉम, बीएसडब्ल्यू, बीएफए, बीकॉम, बीएससी आयटी, बीएससी बायोटेक्नॉलॉजी, बीसीए, बीएससी फॉरेंसिक सायन्स, बीसीए, बीबीए, बीव्होक अशा २७ पदवी अभ्यासक्रमांसह विधी शाखेतील एलएलबी, एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. प्रथमवर्ष प्रवेश क्षमता शाखा प्रवेश क्षमता कला ५४,०५८ वाणिज्य २४,३२८ विज्ञान ४०,७८२ बीसीए, बीबीए, बीसीएस १२,५४० .. ४६३ --महाविद्यालयांची संख्या १,४१,१२१ --एकूण प्रवेश क्षमता विषय-परीक्षार्थींची संख्या अभ्यासक्रमांची संख्या १४६ एवढ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ५ हजार पीआरएन नंबरनुसार विद्यार्थी संख्या १ लाख ५० हजार बैठक क्रमांकनिहाय विद्यार्थी संख्या ४ लाख विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर परीक्षेत जमा होणारी उत्तरपत्रिका संख्या २२ लाख उत्तरपत्रिका परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. डॉ. गणेश मंझा, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pAErIe
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या